राज्यावर अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार

मुंबई | पुढच्या 5 दिवसांत संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या ढगाळ वातावरण असून काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे.

मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सध्या मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह पुण्यात आणि घाटमाथ्यावर ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे.

मुंबईसह, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे जळगाव, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे.

घाटमाथ्यावरच्या ठिकाणांवरही मुसळधार पाऊस होईल तर जिल्ह्यात ढगाळ वातावरण असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण कोकण आज आणि उद्या तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला असून 10 आणि 11 जूनला बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यत आहे. तर 12 तारखेला मात्र मोजक्याच जिल्यांमध्ये पाऊस पडेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

“रोज स्वप्नात उद्या सरकार पडणार असं येतं आणि…”; मुख्यमंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीसांना चिमटे 

हिंदुत्व हा आमचा श्वास, हिंदुत्व हे आमच्या धमन्यांमध्ये आहे- उद्धव ठाकरे 

“मराठवाड्यात शिवसेनेला आव्हान देणारी औलाद अजून जन्माला यायची

“किरीट सोमय्यांनी परत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली तर थोबाड लाल करू” 

“…तर मला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही”