मुंबई | राज्याच्या राजकारणात काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीदरम्यान घडलेल्या हल्ला प्रकरणानं जोरदार वाद झाला होता. अद्यापी हा वाद निवळलेला नाही. अशातच आता भाजप आमदार नितेश राणेंच्या अटकेनंतर जोरदार वाद चालू झाला आहे.
जिल्हा बॅंक निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतिश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. आपल्यावर हा हल्ला भाजप आमदार नितेश राणेंनी केल्याचा आरोप परब यांनी केल्यानं राज्यात खळबळ माजली होती.
संतोष परब यांच्या तक्रांरीनंतर नितेश राणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून नितेश राणे अटकपुर्व जामीनासाठी फिरत होतो. पण त्यांना कोणत्याही न्यायालयानं जामीन दिला नाही.
अखेर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं त्यांची रवानगी पोलीस कोठडीत केली आहे. त्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद पेटला आहे. राज्यातील राजकारण आता ढवळून निघालं आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. नितेश राणेंसाठी पडळकर यांनी एक खास शायरी ट्विट केली आहे. सध्या या ट्विटची राज्यभरात चर्चा आहे.
पडळकर यांनी आमदार नितेश राणेंचा फोटो ट्विट करत लिहील आहे. ‘कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौर-ए-ज़माँ हमारा’, अशा आशयाचं ट्विट पडळकरांनी केलं आहे.
तब्बल दोन महिन्यांपासून राज्यासह देशात हे प्रकरण गाजत आहे. नितेश राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत जामीनासाठी अर्ज केला होता. पण त्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही.
दरम्यान, राणे आणि शिवसेना हा वाद आता आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना देखील अशाच कारवाईचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
आता सुट्टी नाय, होत्याचं नव्हतं करीन पण…- किरण माने
मोठी बातमी! दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात महत्वाची माहिती समोर
“वाईन दारू नसेल तर मरणाऱ्या आईला ती गंगाजळऐवजी पाजाल का?”
वाईन विक्रीबाबत ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
मोठी बातमी! नितेश राणेंपाठोपाठ निलेश राणेंना देखील झटका, आता…