पाषाण तलाव परिसरात आणि उद्यानात प्रेमी युगुलांना बंदी; जाणून घ्या कारण

पुणे | शहरातील पाषाण तलाव (Pashan Lake) परिसराबाबत महानगरपालिकेने (Pune Municipal Corporation) एक नियम जाहीर केला आहे. यात प्रेमी युगुलांना फिरण्यास आणि बसण्यान प्रशासनाने बंदी घातली आहे.

या तलाव परिसरात वेगवेगळे पक्षी स्थिरावतात. त्यामुळे पक्षी निरीक्षण करणाऱ्या पक्षीप्रेमींना अडथळा होत असल्याचे आणि सुरक्षेचे कारण देत पालिकेने हा फतवा काढला आहे.

त्यामुळे आता या उद्यानात अविवाहीत जोडप्यांना फिरण्यास आणि बसण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच नागरिक आणि पर्यावरण प्रेमी संस्थांकडून तलावाची काळजी घेतली जाते.

तलावात कचरा न टाकणे, मैलापाणी टाकले जाऊ नये, जलपर्णी वाढू नये आणि परिसरातील जैवविविधता कायम रहावी आदी गोष्टींसाठी प्रयत्न केले जातात. पाषाण तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत.

त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात विविध पक्षी देखील आढळून येतात. पक्षी निरीक्षणासाठी आलेल्या पक्षीप्रेमींना प्रेमी युगुले अडथळे ठरत असल्याच्या तक्रारी पक्षीप्रेमींनी केल्या होत्या.

नागरिकांच्या तक्रारींना दाद देत महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. पाषाण तलावात आतापर्यंत दोन मृतदेह आढळून आले आहेत. तेथे प्रेमी युगुले आणि अविवाहित जोडप्यांमध्ये वाद होतात, असे आढळून आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदे यांनी पोस्ट केली कविता

“पहाटेचा शपथविधी यशस्वी झाला असता, तर…” उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका

मराठा आरक्षणाच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत वाद; वाचा इतिवृत्त

IPS कृष्ण प्रकाश यांची आईच्या निधनावर भावूक पोस्ट “तुझ्याशिवाय मी काहीच नाही”

तब्बल 15 दिवसांनी राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले, त्यांनी शुद्धीवर येताच म्हंटले…