मुंबई | महाराष्ट्रात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार असल्याचं दिसतंय. महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 6 जागांकरिता निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या 10 डिसेंबरला यावर मतदान होणार आहे.
या सहा जागांमध्ये मुंबई, कोल्हापुर, धुळे, अकोला, नागपूर, गोंदिया-भंंडारा या जागांचा समावेश आहे. या सहा जागांमध्ये रामदास कदम, भाई जगताप, सतेज पाटील, अमरीश पटेल, गिरिश व्यास आणि गोपीकिशन बाजोरिया यांचा कार्यकाळ संपत आहे.
शिवसेनेकडून रामदास कदम यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. रामदास कदम यांच्याऐवजी नव्या चेहऱ्याला विधान परिषदेत संधी दिली जाण्याची चर्चा सध्या सुरू आहे.
काही दिवासांपूर्वी रामदास कदम आणि प्रसाद कर्वे नावाच्या व्यक्तीच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या. त्यावर भाजपने आक्रमक भूमिका घेतली होती.
रामदास कदम यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविषयी काही पुरावे दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर नाराज अल्याचं सांगितलं जात होतं.
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये रामदास कदम यांनी अनिल परब यांच्याविषयी दारूगोळा पुरवल्याचं दिसून येत आहे. मात्र, या ऑडिओ प्रकरणाचा आणि माझा काहीही संबंध नसल्याचं रामदास कदम यांनी सांगितलं होतं.
रामदास कदम यांचा पत्ता कट होत असल्यानं आता या जागेवर कोणाला उमेदवारी मिळणार यावर आता चर्चेला उधाण आल्याचं दिसतंय.
रामदास कदम यांच्या जागी आता तरूण उमेदवाराला संधी मिळण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना यावर कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
निवडणूकीची अधिसुचना येत्या 16 नोव्हेंबरला जाहिर होणार आहे. तर नामनिर्देशित पत्रे सादर करण्याची तारीख 23 नोव्हेंबर पर्यंत देण्यात आली आहे.
दरम्यान, या जागांवर येत्या 10 डिसेंबरला मतदान होणार आहे तर येत्या 14 डिसेंबरला यावर मतमोजणी देखील होणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
ठाकरे सरकारचा फडणवीसांना दणका! आता ‘या’ प्रकरणाची चौकशी होणार
मोठी बातमी! शरद पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत राजभवनावर; राजकीय घडामोडींना वेग
“नारायण राणे यांच्यात हिंमत असेल तर…”
“उद्या सकाळी मुंबईत हायड्रोजन बाॅम्ब फुटणार”
‘मेरे ख़याल को बेड़ी पहना नहीं सकते’; नवाब मलिक यांचं सूचक ट्विट