बाबो! आज देखील सोन्याच्या दरात वाढ, वाचा किती रूपयांनी महागले सोनं

नवी दिल्ली | अलिकडे काही वर्षांमध्ये सोन्याचे भाव प्रचंड वाढले आहेत. एक उत्तम गुंतवणूक म्हणून लोक सोेन्याला प्राधान्य देत आहेत. सोन्याच्या वाढत्या भावामुळे सोनं खरेदी करणं सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात घट पहायला मिळाली होती. मात्र, आता सलग २ दिवस सोन्याच्या दरात तेजी पहायला मिळत आहे.

मंगळवारी २४ कॅरेट सोन्याचे दर २३० रुपयांनी वाढून ४७ हजार २३० रूपये प्रती तोळा इतके झाले होते. आज या दरात पुन्हा एकदा वाढ पहायला मिळाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात पुन्हा १० रुपयांची वाढ होऊन सोनं ४७ हजार २३० रूपये प्रती तोळा झाले आहे.

सोन्याच्या तुलनेत चांदीच्या दरात आज मोठी घट पहायला मिळत आहे. काल चांदीचे दर ७० हजार २०० रुपये प्रती किलो होते. आज या दरात ६०० रूपयांची घट झाली आहे. आज चांदीेचे दर ६९ हजार ६०० रुपये प्रती किलो झाले आहेत.

मागील आठवड्यात सोन्याच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली होती. तसेच येत्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात. देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याची किंमत 42 हजार प्रति दहा ग्रॅम रुपयांपर्यंत घसरू शकते, असे अनेक अर्थतज्ञ बोलत आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना सोने आणि चांदीवरील सीमा शुल्क 7.5 टक्क्यांवर आणण्याचा प्रस्ताव दिला. सध्या ते 12.5 टक्के आहे. अर्थमंत्र्यांनी हा निर्णय घोषित करताच सोन्याच्या दरात मोठी घट पहायला मिळाली होती.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर केल्यापासून सोन्या चांदीच्या दरात सतत चढउतार पहायला मिळत आहे. अलिकडे आंतराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलरच्या तुलनेेत रुपयांचा भाव कमी होताना दिसत आहे.

तसेच कोरोनावरिल लसींच्या बातम्यांमुळे सोन्या चांदीच्या दरावर देखील परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गुंतवणूकदार देखील सोन्याकडून शेअर बाजाराकडे वळत आहेत. यामुळे सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरत आहेत.

महत्वाच्या बातम्या –

जाणून घ्या बहुगुणी कोरफडचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे

क्या बात! ‘ही’ कंपनी रात्रीच्या वेळी ग्राहकांना देणार मोफत अनलिमिटेड हाय स्पीड इंटरनेट

मुलीचे ‘हे’ ईशारे दर्शवतात की ती तुम्हाला पसंत करते, बिनधास्त करा प्रपोज!

Koo अ‍ॅपवर कंगनाची धमाकेदार एन्ट्री, पहिल्याच पोस्टमध्ये ट्विटरवर निशाणा म्हणाली…..

राठोडांचा पाय आणखी खोलात! वनमंत्री संजय राठोड ग.जाआड?