डाॅली की टपरी!!! सोशल मीडियावर आता ‘या’ चहावाल्याचा स्वॅग, पाहा व्हिडीओ

चहा घेणार का?…फार कमी लोकं या प्रश्नाना नाही म्हणतात. चहाची चाहत अनेक जणांना असते. त्यातचं नागपूर जिल्ह्याचं नाव घेतलं की आपल्या डोळ्यासमोर संत्री येते. मात्र आता नागपूरचं नाव घेतल्यावर चहा प्रेमींसाठी ‘डॉली की टपरी’ डोळ्यासमोर येत आहे.

‘डॉली की टपरी’ या जागेच्या लोकप्रियतेमागे त्या दुकानाचा मालक डॉली असून त्याच्या हाताची चव त्यासोबतच त्याचा अनोखा स्वॅगसुद्धा आहे.

डॉलीचा चहा बनवतानाचा व्हिडीओ एका व्यक्तीने शूट करुऩ तो सोशल मीडियावर शेअर केला आहे. शेअर केलेला डॉलीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

गेल्या 20 वर्षापासून डॉली चहाचं दुकान चालवत आहे. केवळ चहा बनवण्यातच नाही तर ग्राहकांना सिगारेट पेटवून देण्यातही डॉलीची एक वेगळीच शैली आहे. त्याचबरोबर त्याची पैसे-देतानाची स्टाईलही पाहण्यासारखी आहे.

डॉली चहाची टपरी सकाळी 6 वाजता उघडतो आणि रात्री 9 वाजता बंद करतो. हा चहा केवळ सात रुपयांमध्ये मिळतो. तसेच पहिल्यांदा चहा पिण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला डॉली मोफत चहा देता.

डॉलीच्या अॅटीट्यूड आणि स्टाईलबद्दल विचारल्यावर तो अभिनेता रजनीकांतचा मोठा फॅन आहे. तसेच त्याला दक्षिणात्य चित्रपट पहायला आवडतात.

डाॅलीची चहा बनवण्याची आणि चहा देण्याची पद्धत भन्नाट आणि शैलीदार आहे. डाॅली अगदी उंचावरुन उकळणाऱ्या चहाच्या द्रावणातून दूध ओततो.

अगदी उंचावरुन आणि वेगात हे सर्व करताना अगदी थेंबभरही दूध खाली सांडत नाही. स्टायलिश आणि स्वॅगवाला असल्यानं साहजिकचं डाॅली तरुणांमध्ये जास्तच लोकप्रिय आहे. डाॅलीची लांब केस, उठून दिसणारे तीक्ष्ण नाकडोळे यामुळे काहीजण त्याला ‘जॅक स्पॅरो आॅफ इंडिया’ असंही म्हणतात.

महत्वाच्या बातम्या –

सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी खूशखबर; ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त झालं सोनं

बाबा रामदेव यांचा पुन्हा एक दावा! ‘हा’ रामबाण उपाय केल्यास कोरोना रूग्ण तीन दिवसांत बरा होणार

होम क्‍वारंटाइन रुग्णांवर मुंबई पालिका प्रशासनाचं असणार लक्ष, घराबाहेर पडल्यास होणार ‘ही’ कारवाई

ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यास तुम्हाला देखील माहित हवेत ‘हे’ नियम; नक्की जाणून घ्या

संपूर्ण रेल्वे तिच्यावरुन धडधडत गेली अन् मग…; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!