रोम | जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्णांची आणि मृतांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका इटलीला बसला असून भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे.
इटलीत चीनपेक्षाही सर्वाधिक मृतांची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत इटलीत 627 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 5986 नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. आतापर्यंतचा हा सर्वोच्च आकडा आहे.
इटलीत एकाच दिवसांत 5986 नवे रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली असून जगभरात चिंतेचे वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 47 हजार 21 इतकी झाली आहे. तर मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे.
दरम्यान, इटलीत कोरोनाच्या संसर्गामुळे 4032 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2655 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
महत्वाच्या बातम्या –
-…म्हणुन आरोग्यमंत्र्यांनी दिला खासगी आणि शासकीय कार्यालयातील एअर कंडिशन बंद करण्याचा सल्ला
-नरेंद्र मोदींचं ‘जनता कर्फ्युचे’ आवाहन, प्रत्येक भारतीयांच्या भल्यासाठीच-प्रशांत दामले
-मुंबई, पुणे, नागपुरातील व्यवहार ठप्प; राज्यातील 10 शहरं लॉक डाऊन
-कोरोनाच्या संदर्भात कॉन्फिडन्स पेट्रोलयमचे अध्यक्ष नितीन खारा यांनी मोदींना केली ही सूचना