माजी खासदार चंद्रकांत खैरेंची आता नवी भविष्यवाणी

औरंगाबाद : जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे आंबादास दानवे हे विजयी होणारच, असा विश्वास शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे. खैरेंनी भाजपचे प्रवक्ते शिरीश बोराळकर यांनाही पदवीधर मतदारसंघासाठी शुभेच्छा दिल्या. 

मी खासदार असताना संसदेत माझ्या शेजारी बसणारे नेते मुख्यमंत्री झाले. आता माझ्या डाव्या आणि उजव्या दानवे आणि बोराळकर हेदेखील आमदार होतील, अशी भविष्यवाणी खैरेंनी वर्तवली आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीपेक्षा महायुतीचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आंबादास दानवेंचा विजय निश्चित समजला जातो. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी औरंगाबादमध्ये अनेक अदृश्य हात आपल्या उमेदवाराला मदत करणार असल्याचा दावा केला आहे. 

या पार्श्वभूमीवर सेना-भाजपची एकत्र बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरै, आमदार प्रशांत बंब, भाजप प्रवक्ते शिरीश बोराळकर, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावंकर आणि महायुतीचे उमेदवार आंबादास दानवे हे नेते उपस्थित होते. याच बैठकीत चंद्रकांत खैरेंनी भविष्यवाणी केली आहे. 

बोराळकर आणि दानवे यांना आमदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. पार पडलेल्या बैठकीत खैरेंनी परस्पर बोराळकरांना आगामी पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ठरवून टाकल्याने बैठकीला उपस्थितांमध्ये चांगलीच चर्चा रंगली.

महत्वाच्या बातम्या-

-राज्यसभेनंतर लोकसभेतही जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर

-“भाजपने स्वत:च्या आनंदासाठी घटनात्मक वचनाचा घात केला”

-“‘नाच्या’चं काम तुमचं नाही, तुम्ही पाण्याचं बघा”

-“भाजपची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा”

-काश्मीरबाबत बेजबाबदार वक्तव्य; गौतमने केली शाहीदची कानउघडणी