मुंबई | आजच्या तरुण वर्गामध्ये पॅराग्लायडींग सारख्या धाडसी गोष्टी करण्याचं चांगलंच फ्याड आहे. तरुणांना अशा धाडसी गोष्टी करायला खूप आवडतात. मात्र, काही वेळा इतरांचं पाहून काही लोक हे धाडस करायला जातात पण ते चांगलंच अंगलट येतं. सध्या असंच पॅराग्लायडींग करणाऱ्या एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही तरुणी पॅराग्लायडींग करण्याचं धाडस करते. मात्र पॅराग्लायडींग करताना तरुणी अक्षरशः रडते. या तरुणीने पॅराग्लायडींग करताना स्वतः हा व्हिडिओ शूट केला होता आणि हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही तरुणी पॅराग्लायडींग करण्याचं धाडस करते. पॅराग्लायडींग करताना तिच्याबरोबर इन्स्ट्रक्टर देखील असतो. पण जसे का ती उंच हवेत जाऊ लागतात तशी तरुणी रडायला सुरुवात करते.
ही तरुणी इन्स्ट्रक्टरकडे खाली उतरवण्यासाठी गयावया करू लागते. तसेच इन्स्ट्रक्टरला ती धीम्या गतीने चालवण्यास सांगते. संपूर्ण पॅराग्लायडिंगमध्ये या तरुणीने डोळे झाकलेले असतात. इन्स्ट्रक्टर तरुणीला खाली दिसणारं दृश्य पाहण्यास सांगतो पण ती तरुणी डोळे उघडत नाही.
याउलट इन्स्ट्रक्टरच्या समजवण्यानंतर ती तरुणी जोरजोराने रडू लागते आणि खाली उतरवण्यासाठी गयावया करू लागते. अखेर इन्स्ट्रक्टर काही वेळातच तरुणीला घेऊन खाली उतरतो आणि मग ती तरुणी शांत होते.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक व्हिडीओ पाहून लोटपोट होत हसत आहेत तर काही लोक ही तरुणी नाटक करत असल्याचं बोलत आहेत.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
तुझ्या मुलीला तिच्या बॉयफ्रेंडनं किस केलं तर??? शाहरुखच्या उत्तरानं सारेच झाले हैराण
हिरेन प्रकरणातील ती मर्सिडीज भाजप नेत्याची? सचिन सावंत यांचा पुराव्यांसह धक्कादायक खुलासा!
मुलानं आईच्या कानशिलात लगावली, अन् आईनं जागेवर प्रा.ण सोडले; पाहा व्हिडिओ
धुळ्यात भर रस्त्यात दीर-भावजयीचा दा.रु पिऊन राडा, पोलिसांनाही केली शि.वीगाळ…; पाहा व्हिडिओ