अजित पवारांकडून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन; ‘या’ कृतीची महाराष्ट्रभर चर्चा

पुणे | केंद्रीय गृहमंत्री आज आणि उद्या पुण्यात असतील. अमित शाहांचा पुण्यातील मुक्काम व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये असेल. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar)त्यांचा राखीव सूट दिला मुक्कामासाठी अमित शाहांना दिला आहे.

अमित शहांना राखीव सूट देत अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे. अजित पवारांच्या या कृतीचं महाराष्ट्रभरातून कौतुक होत आहे.

अमित शहा (Amit Shaha) यांच्या कार्यालयानं खासगी ठिकाणी मुक्कामाची सोय नको असं जिल्हा प्रशासनाला कळवलं होतं. पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये दोन सुट आहेत त्यापैकी एक सुट कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांना राखीव असतो. तर दुसरा उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासाठी राखीव असतो.

अजित पवार याच दालनात अजित पवार बैठक घेत असतात. मात्र, अमित शहा यांच्या कार्यालयाकडून खासगी हॉटेलमध्ये मुक्काम नको हे कळवल्यावर ही गोष्ट अजित दादांच्या कानावर जाताच त्यांनी त्यांचा सूट अमित शहांना मुक्कामासाठी दिल्याची माहिती आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री तथा सहकारमंत्री अमित शाृहा (Minister Amit Shah maharashtra Tour) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाने शहा यांच्या या दौऱ्याला सुरुवात होईल. त्यानंतर ते प्रवरानगर इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला हजेरी लावतील.

या मेळाव्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थिती असेल.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर इथं विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आलाय. अमित शहा पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट” 

“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा” 

रोहित पाटलांच्या ‘बघून घेतो’च्या भाषेवर अजित पवार म्हणाले… 

महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी समोर; Omicron बाबत तज्ज्ञांचा धक्कादायक दावा 

“शरद पवारसाहेब झुकून नमस्कार करतील असे पाय दिसत नाहीत”