वडिल 9 वेळा काँग्रेसचे खासदार, ‘या’ नेत्याची आमदार मुलगी करणार शिवसेनेत प्रवेश???

मुंबई : काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. नुकतंच निर्मला गावित यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची नाशिकमधील इगतपुरीत इथं भेट घेतली. निर्मला गावित या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांची कन्या आहेत. त्या लवकरच शिवबंधन बांधतील असे संकेत आहेत. 

निर्मला गावित नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीच्या काँग्रेस आमदार आहेत. माणिकराव गावित हे गांधी घराण्याचे अत्यंत जवळचे आहेत. माणिकराव गावित हे सलग नऊवेळा नंदुरबारचे खासदार म्हणून संसदेत निवडून गेले. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिना गावित यांनी माणिकराव गावित यांचा पराभव करुन दहाव्यांदा लोकसभेत जाण्याचा त्यांचा विक्रम रोखला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. राज्यभरातील विविध नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.

निर्मला गावित या काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. त्या नाशिकमधील इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात. 2009 आणि 2014 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता.

9 वेळा खासदार राहिलेले माणिकराव गावित यांच्या त्या कन्या आहेत. निर्मला गावित यांनी काँग्रेसची विविध पदं भूषवली आहेत.

दरम्यान, कालच शिवसेनेचे माजी आमदार आणि राष्ट्रवादीकडून यंदा दिंडोरी लोकसभा निवडणूक लढवलेले धनराज महाले यांनी पुन्हा शिवबंधन बांधलं.

महत्वाच्या बातम्या-

-देशहिताच्या आड धर्म येता कामा नये!;’एक देश, एक संविधान’ भूमिकेचं ठाकरेंनी केलं स्वागत

-इम्रान खान यांचा मदतीसाठी ट्रम्प यांना फोन; ते म्हणाले…तुमचं तुम्ही बघा!

-“महापूर तीन जिल्ह्यातील प्रश्न आहे, त्यासाठी निवडणुका पुढे झकलण्याची गरज नाही”

-“नारायण राणेंनी शिवसेना सोडून चूक केली”

-…आता खासदार झालो तेही माझ्या मर्जीने नाही- नारायण राणे