डेव्हिड वॉर्नर याने विराट कोहलीचा ‘तो’ विक्रम मोडला!

नवी दिल्ली | सध्या आयपीएलच्या 13 व्या पर्वात अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. रविवारी या पर्वातील 35वा सामना शेख जाएद क्रिकेट स्टेडियममध्ये पार पडला. हा सामना सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला गेला.

या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद संघाचे कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे कर्णधार विराट कोहली याचा विक्रम मोडला आहे. नुकतेच विराट कोहली याने आयपीएलमधील 5000 सर्वात जलद धावा करण्याचा विक्रम केला होता.

यातच डेव्हिड वॉर्नर याने कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध हे स्थान मिळवले आहे. आयपीएलमधील 5000 धावांचा टप्पा ओलांडणारा डेव्हिड वॉर्नर हा चौथा खेळाडू ठरला आहे. मात्र, हा सामना सनरायजर्स हैदराबाद संघाला जिंकता आला नाही.

सुपर ओव्हरमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघ जिंकला. 5000 धावांचा टप्पा ओलांडत डेव्हिड वॉर्नर याने अजून एक विक्रम केला आहे. सर्वात कमी सामन्यांमध्ये डेव्हिड वॉर्नर याने 5000 धावांचा टप्पा ओलांडला आहे.

डेव्हिड वॉर्नर आयपीएलमधील 5000 धावा करणारा चौथा खेळाडू ठरला आहे.  या सामन्यात डेव्हिड वॉर्नर याने 33 चेंडूत  नाबाद 47 धावा केल्या आहेत. त्याने आतापर्यंत 135 सामने खेळले आहेत. यात त्याने 5037 धावा केल्या आहेत.

सर्वात कमी सामन्यांमध्ये 5000 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत डेव्हिड वॉर्नर हे नाव पहिल्या क्रमांकावर आले आहे. विराट कोहली याने 157 सामन्यांमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडला होता. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर सुरेश रैना आहे. त्याने `173 सामन्यांमध्ये 5000 धावा पूर्ण केल्या आहे.

चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. रोहित शर्मा याने 187 सामन्यात 5000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. 5000 धावा पूर्ण करणाऱ्या खेळाडूंमध्ये सुरेश रैना, विराट कोहली आणि रोहित शर्मा या तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. तसेच या यादीत डेव्हिड वॉर्नर हे पहिले परदेशी खेळाडू ठरले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला. या सामन्यात सनरायजर्स 34 धावांनी हरली. पण सनरायजर्स हैदराबाद हा सामना हरून देखील संघाचे कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने उत्तम फलंदाजी करत 60 धावा केल्या. या धावांनी ते संघाला विजयी करू शकले नाही पण त्यांनी आयपीएलमध्ये 49 वेळा 50 पेक्षा जास्त धावा केल्या आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सचिन तेंडूलकर नंतर आता केएल राहुलनंही केला ‘तो’ विक्रम!

परिस्थितीवर मात करत हिमाचलचा ‘हा’ व्यक्ती न्यूझीलंड सरकारमध्ये बनला मंत्री!; वाचा सविस्तर

आयपीलमध्ये ‘या’ युवा खेळाडूनं अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकत रचला नवा विक्रम!

भारतीय खेळाडूंनी रचला नवा विक्रम! आयपीएलच्या इतिहासात प्रथमच घडली ‘अशी’ गोष्ट

पायल घोष अनुरागनंतर आता ‘या’ बड्या खेळाडूवर गंभीर आरोप करत म्हणाली…