खेळ देश

डेविड वॉर्नरनं असा भीमपराक्रम केलाय, रोहित-विराटसारखे दिग्गजही जवळपास नाहीत!

नवी दिल्ली | २०२० च्या मोसमातील १७ वा आयपीएल सामना काल दुपारी पार पडला. हा आयपीएल सामना शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला गेला. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना पार पडला.

हा सामना सनरायजर्स हैदराबाद ३४ धावांनी हरली. पण सनरायजर्स हैदराबाद हा सामना हरून देखील त्यांच्या कर्णधाराने नवा विक्रम केलाय. सनरायजर्स संघाचे कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी उत्तम फलंदाजी करत ६० धावा केल्या.

डेव्हिड वॉर्नर हे ६० धावा करूनही संघाला विजयी करू शकले नाही, पण डेव्हिड वॉर्नर यांनी एका नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. आयपीएलमध्ये ४९ वेळा डेव्हिड वॉर्नर यांनी ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहे.

५० पेक्षा जास्त धावांबाबतीत बोलायचं झालं तर विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे दिग्गज खेळाडूही याबाबतीत मागे आहे. डेव्हिड वॉर्नर यामध्ये खूपच पुढे आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर डेव्हिड वॉर्नर आहे. विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.

विराट कोहली यांनी ४२ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहे. तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आणि सुरेश रैना हे दोन्हीही खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंनी ३९ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहे. या यादीत चौथ्या स्थानावर एबी डिव्हीलीयर्स आहे.

एबी डिव्हीलीयर्स यांनी ३८ वेळा ५० पेक्षा जास्त धावा केल्या आहे. नुकताच सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना खेळला गेला. या सामन्यात डेव्हिड वॉर्नर यांनी ४४ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार मारले.

या सामन्यात डेव्हिड वॉर्नर यांचा स्ट्राईक रेट १३६.२६ होता. मुंबई इंडियन्स संघाच्या डिकॉक यांनी ३९ चेंडूत ६७ धावा केल्या. यात डिकॉक यांनी चार चौकार आणि चार षटकार मारले. या सामन्यात डिकॉक यांचा स्ट्राईक रेट १७१.७९ होता.

ईशान किशन यांनी २३ चेंडूत ३१ धावा, हार्दिक पंड्या यांनी १९ चेंडूत २८ धावा, पोलार्ड यांनी १३ चेंडूत २५ धावा आणि क्रुणाल पंड्या यांनी ४ चेंडूत २० धावा केल्या. डिकॉक तसेच या सर्व खेळाडूंच्या धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघ २० षटकांमध्ये ५ विकेट गमावून २०८ धावा करू शकले.

यात दुसऱ्या बाजूला सनरायजर्स हैदराबाद संघाने २० षटकांमध्ये ७ विकेट गमावून १७४ धावा करू शकले, पण ३४ धावांमुळे संघाला सामना गमवावा लागला. जॉनी बॅरिस्टो यांनी १५ चेंडूत २५ धावा तर मनीष पांड्ये यांनी १९ चेंडूत ३० धावा केल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

“सुशांतला धमकावत त्याच्यावर बला.त्काराचे आरोप केले जात होते”

पहिल्या महिंद्रा थारची बोली पोहोचली 1.10 कोटीवर; का लावत आहेत लोक एवढी बोली?

‘टॉप’वर पोहचण्यासाठी अनेक हिरोईननी केलं ‘हे’ काम; ईशा कोप्पिकरचा धक्कादायक खुलासा

सुशांत प्रकरणी अखेर मौन सोडत प्रसून जोशी यांनी दिली महत्वाची माहिती म्हणाले…

सुशांतनं आत्मह.त्याच केली होती हे समोर आल्यानंतर सुशांतची बहिण म्हणतेय…