दयाबेनला पहिल्या शोसाठी मिळाले होते फक्त ‘इतके’ रुपये, वाचा पहिल्या पगाराचा भन्नाट किस्सा

मुंबई| टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये अशी अनेक पात्र आहेत जी प्रेक्षकांच्या मनावर अनेक वर्षांपासून राज्य करत आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेला प्रेक्षकाकडून चांगली प्रसिद्धी मिळत आहे. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतल्या आहेत. या मालिकेला अनेक वर्ष होऊनही या मालिकेची लोकप्रियता थोडीही कमी झालेली नाही.

दया बेन उर्फ दिशा वकानी ही छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. आज ती तिच्या खऱ्या नावापेक्षा दया बेन या नावानेच जास्त लोकप्रिय आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेतील तिच्या विनोदी भूमिकेमुळे तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

सध्या दिशा म्हणजेच दया बेन ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत भूमिका साकारत नाहिये. तिचे चाहते दिशा वकानी या कार्यक्रमात परत कधी येणार हे जाणून घेण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून वाट पाहत आहेत . ती 2017 मध्ये मालिकेतून मॅटरनिटी लिव्हवर गेली आणि तेव्हापासून ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये परत आली नाही.

अलिकडेच दिशा वकानीनं एका मुलाखतीदरम्यान आपल्या पहिल्या पगाराचा भन्नाट किस्सा सांगितला होता. त्यामुळे तिचा हा भन्नाट किस्सा चर्चेचा विषय बनत आहे.

कोईमोईला दिलेल्या मुलाखतीत दिशा वकानीने आपल्या करिअरबद्दल सांगितले आणि त्यावेळी तिने आपल्या पहिल्या पगाराचा अनुभव सांगितला. दिशाने गुजराती रंगभूमीवरुन आपल्या करिअरची सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये असताना दिशाने एका व्यवसायिक नाटकात काम केले होते. या नाटकाचे तिने पाच प्रयोग केले होते. तिची भूमिका खूपच लहान होती. यासाठी तिला 250 रुपये पगार मिळाला होता.

याविषयी बोलताना पुढे ती म्हणाली की, हे पैसे तिने आपल्या वडिलांना दिले होते. तिचा पहिला पगार पाहून वडिलांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. ते पैसे तिच्या वडिलांनी अद्याप खर्च केलेले नाहीत. ते त्यांनी एखाद्या पुरस्काराप्रमाणे फ्रेम करुन ठेवले आहेत. हा अनुभव सांगताना दिशा फारच भावूक झाली होती.

दरम्यान, दिशा वकानीनं खूप मेहनत करत आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

भारतातील ‘या’ शहरात 100 वर्षांसाठी लॉकडाऊन…

‘हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते’; बॉलिवूडच्या…

नॅशनल क्रश रश्मिका मंदना गुडबायमध्ये बॉलिवूडमधील…

मास्क न घातलेल्या कंगना रणौतला ‘या’ अभिनेत्यानं…

उन्हाळ्यात ‘हे’ पदार्थ खाणं टाळा, नाहीतर होऊ…