मैने सोचा ना था!; दयाबेन-जेठालालचा रोमॅन्टिक व्हिडीओ व्हायरल

मुंबई | छोट्या पडद्यावरील सर्वांना खळखळून हसवणारी मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ गेल्या 12 वर्षापासून सर्वात लोकप्रिय मालिका आहे. लहानांपासून वृद्धांपर्यत ही मालिका अजूनही सर्वजण पाहतात.

तारक मेहतामधील कलाकरांनी मागील अनेक वर्षात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेत दयाबेन म्हणजेच दिशा वाकानी आणि जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांची जोडी सर्वांनाच आवडते.

ऑनस्क्रिनवर या जोदीची भूमिका आणि कलाकारी सर्वांना थक्क करून सोडते. दोघांचं टायमिंग देखील परफेक्ट जुळतं. जेठालाल आणि दयाबेन खऱ्या आयुष्यात देखील चांगले मित्र आहेत.

अशातच या दोघांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायल होताना दिसत आहे. जेठालाल आणि दयाबेन यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

90 च्या दशकातील हिट चित्रपटातील गाणं ‘एक दिन आप हम ऐसे मिल जाएंगे’ यावर जेठालाल आणि दयाबेनने डान्स केला. या व्हिडीओमध्ये एक कोरियोग्राफर देखील दिसत आहे.

दोघांचा हा व्हिडीओ त्यांच्या चाहत्यांना आवडला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर लाईक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका कार्यक्रमाच्या तयारीसाठी हा डान्स बसवला जात असल्याचं सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी दिलीप जोशी हा शो सोडणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यावर आता खुद्द दिलीप जोशी यांनी नकार देत चर्चांना पुर्णविराम दिला आहे.

पाहा व्हिडीओ-


महत्वाच्या बातम्या –

मोठी बातमी! कोरोनामुळे ‘या’ शहरातील पहिली ते आठवीच्या शाळा बंद

कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…

 …म्हणून भर स्टेजवर पंकजा मुंडेंच्या डोळ्यात आलं पाणी, पाहा व्हिडीओ

अभिजित बिचुकले ‘या’ अभिनेत्रीला भिडला; बिग बॉसच्या घरात धक्कादायक प्रकार

प्रवीण दरेकरांचा करिश्मा, ‘ही’ निवडणूक एकहाती जिंकली!