वरूण धवनला मोठा धक्का; जवळच्या व्यक्तीचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन

मुंबई | अभिनेता वरूण धवनला मोठा धक्का बसला आहे. वरूणने आपल्या एका जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. काल रात्री वरुण धवनचे ड्रॉयव्हर मनोज यांचं निधन झालं आहे.

मनोज यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यावेळीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांना तातडीने मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं आहे.

वरुणला याबद्दलची माहिती मिळताच त्याने आपलं शूटिंग सोडून रुग्णालयात धाव घेतली. वरुण आणि मनोज यांच्यात फार जवळचं नातं होतं. दोघांमधील बाँड अनेकवेळा मीडियासमोर देखील पाहायला मिळालं.

आपल्या अत्यंत जवळच्या व्यक्तीला गमावल्याने अभिनेता फारच दुखी आहे. वडील डेव्हिड धवन यांनी वरुण धवनशी संवाद साधून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केल्याचं समजतं.

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, डेव्हिड धवन यांनी वरुणला आपण मनोज यांच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी उचलणार असल्याचं सांगितलं आहे.

ही बातमी ऐकून धवन कुटुंब खूप दुःखी असल्याचं बोललं जात आहे. म्हणजे धवन कुटुंबीय मनोज यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत आणि त्यांना सर्वतोपरी मदत करत आहेत.

वरुणने स्वत: हॉस्पिटलमधील सर्व औपचारिकता पूर्ण केली. रुग्णालयातील वरुणचे फोटोही समोर आले आहेत. वरुणने मास्क घातला असला तरी त्याच्या डोळ्यात दुःख स्पष्टपणे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

दहावी, बारावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; लवकर अर्ज करा 

“मारणं आणि जीवे मारणं यातला फरक कळतो का?”

कोरोना कधी संपणार?; WHO नं दिलेल्या उत्तरानं जगाचं टेंशन वाढवलं 

गर्भवती महिलांसाठी महत्वाची बातमी; कोरोना लस घेण्याबाबत तज्ज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना सर्वात मोठा झटका