मोठी बातमी! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्याचा मृत्यू

मुंबई | भाभी जी घर पर है फेम अभिनेता दिपेश भान (Deepesh Bhan) यांचे निधन झाले आहे. शोमध्ये दीपेश मलखान सिंगच्या भूमिकेत दिसला होता. दिपेश त्याच्या कॉमेडीसाठी ओळखला जातो.

क्रिकेट खेळताना त्यांचा मृत्यू (Death) झाल्याची माहिती मिळते आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भाभीजी घर पर हैं टीमने एक निवेदन जारी करून म्हटलं आहे की, आमचे लाडके दीपेश भान यांच्या आकस्मिक निधनाने खूप दु:ख आणि धक्का बसला आहे.

क्रिकेट खेळत असताना दीपेश भान अचानक कोसळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. यामुळे दीपेश भान यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्काच बसलायं.

दरम्यान,  दीपेशने वयाच्या अवघ्या 41 व्या वर्षी हे जग सोडले. दिपेशने दिल्लीतून पदवी घेतल्यानंतर थेट नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. येथून अभिनयाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर 2005 मध्ये दीपेश मुंबईत आला होता.

41 वर्षाचे दीपेश यांचे 3 वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे. त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, ‘भाभीजी घरपर है’ ही विनोदी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत. मलखानला या मालिकेमुळे अफाट लोकप्रियता मिळाली होती. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

या मालिकेत त्याने वैभव माथूरच्या मित्राची भूमिका साकारली होती. वैभव आणि दीपेश यांची जोडी ‘टीका-मलखान’ म्हणून लोकप्रिय होती. अभिनेत्याच्या अशा अचानक जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ प्रकरणांचे तपास महाराष्ट्र पोलिसांच्या हातून काढले 

प्रसिद्ध गायक अदनान सामीनं उचललं धक्कादायक पाऊल; चाहतेही झालेत हैराण 

“काळजी करू नका सरकार पडणार नाही, या सरकारला दृष्ट लागू नये” 

“डिलिव्हरीचा मुहूर्त ठरलेला दिसत नाही, मंत्र्यांचा पाळणा कधी हलणार?”

नीरव मोदीला ईडीचा जोर का झटका; केली ‘ही’ मोठी कारवाई