मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला मनसेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे विधानसभा निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढता राज्यभरात भाजपच्या विरोधात प्रचार केला होता. त्यावेळी मनसे लोकसभेत शक्ती खर्च न करता विधानसभेवर लक्ष केंद्रीत करेल, असा अंदाज वर्तवला गेला होता. मात्र काही दिवसांपूर्वीच मनसेत विधानसभा निवडणूकही न लढण्याचा सूर पाहायला मिळाला.
मनसेच्या मागील बैठकीत राज ठाकरेंनी निवडणूक न लढण्याबाबत सूर व्यक्त केला. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनीही राज ठाकरेंच्या सुरात सूर मिसळला. विशेष म्हणजे स्वतःकडील पैसे जपून वापरा. देशाची आर्थिक स्थिती यापुढे अत्यंत बिकट होईल, असा सल्लाही राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्याचं बोललं गेलं.
राज ठाकरेंच्या निवडणूक न लढण्याचा सूर पाहाता बैठकीला उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही त्याला होकार दिला आहे. मात्र काही जागा लढवाव्यात अशीही काही पदाधिकाऱ्यांची भावना असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीत मनसेची अधिकृत भूमिका जाहीर होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
छत्रपतींचे वारस दिल्लीत जाऊन गमछा घालण्यातच धन्यता मानतात- शरद पवार- https://t.co/eYe8YTB9QR #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019
“पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी केलेली 15 कामे दाखवा” – https://t.co/sSRpYaOGUI @ShivsenaComms @BJP4India
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019
सुनिल गावसकर यांचं धोनीबाबत खळबळजनक वक्तव्य!- https://t.co/MDr6s1UrSL #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 20, 2019