‘जन गण मन’ ऐवजी आता ‘या’ गीताला राष्ट्रगीत म्हणून घोषित करा – हिंदू महासंघ

नवी दिल्ली | सरकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फोनवर एकमेकासोबत बोलताना ‘हेलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ म्हणावे, असे वक्तव्य आणि मागणी सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantivar) यांनी केली आहे.

अनेक राजकीय नेत्यांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा विरोध देखील केला आहे. ‘वंदे मातरम्’ ऐवजी आम्ही ‘जय बळीराजा’ म्हणणार, असे काँग्रेसने (INC) म्हटंले आहे.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आढाव (Jitendra Awhad) यांनी मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांना सुधीरजी मुनगंटीवार म्हणावे, सुधीरभाऊ मुनगंटीवार म्हणावे, की आणखी काही, असे आव्हाड म्हणाले आहेत.

तसेच आम्हाला जे म्हणायचे ते आम्ही म्हणार आहोत. नाही बोललो तर ते काय आम्हाल जेलमध्ये टाकणार का? असे आव्हाड म्हणाले. त्यांनी स्वत:ला आम्ही काय म्हणायचे ते सुद्धा लिहून द्या, असे देखील आव्हाड म्हणाले.

भारत स्वांतत्र्य झाला तो मोकळा श्वास घेण्यासाठी. तुम्ही ते स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका. स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम करु नका, असे आव्हाडांनी मुनगंटीवार यांना उद्देशून म्हंटले आहे.

आता वंदे मातरम् वरुन वातावरण तापत असतानाच हिंदू महासंघाने त्यात उडी घेतली आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी देखील तीच मागणी करत एक पाऊल पुढे टाकले आहे.

जन गण मन (National Anthem of India)ऐवजी आता वंदे मातरम् ला राष्ट्रगीत घोषित करा अशी मागणी दवे यांनी केली आहे. वंदे मातरम् ला राष्ट्रगीत घोषित करावे आणि सर्व शाळा आणि सरकारी कार्यालयांत वंदे मातरम् म्हणणे अनिवार्य करावे असे दवे म्हणाले आहेत.

हिदूंना अनुकूल असे निर्णय घेताना आणि हिंदूंच्या बाजूने काही ठरविताना मुस्लिम समाजाचे नेते नेहमी विरोध करत आले आहेत. वंदे मातरम् म्हणाल्याने त्यांचे काही नुकसान होणार नाही, असे दवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

काँग्रेसला नवे अध्यक्ष मिळणार, जाणून घ्या कोण कोण आहे शर्यतीत?

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, चिन्हाबाब एन. व्हि. रमणांचा महत्वपूर्ण निर्णय

शिंदे – फडणवीस सरकारमध्ये असंतोष? शंभुराज देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले…

विनायक मेटे अपघात प्रकरण : नवीन माहिती समोर, दोन गाड्या करत होत्या…

“एक गट अन् बारा भानगडी”; उद्धव ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले…