राणेसाहेब… पराभवाची हॅट्रीक चुकवायची असेल तर निवडणूक लढवू नका; शिवसेनेचा सल्ला

सिंधुदुर्ग | कोकणासाठी केसरकर-राणे हा वाद  नवा नाहीये. आता तर विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. गृहराज्यमंत्री दीपक सावंत यांनी खासदार नारायण राणे यांना डिवडण्याचा प्रयत्न केला आहे.

नारायण राणेंना जर हॅट्रीक चुकवायची असेल तर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये, असा सल्ला शिवसेना नेते आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणूक नारायण राणे मालवण-कुडाळ मतदारसंघातून लढतील, अशी घोषणा राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी केली आहे. त्याचाच धागा पकडत केसरकरांनी राणेंना सल्ला दिला आहे.

नारायण राणे दोनवेळा हरले आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते कुडाळमधून हरले आणि पोटनिवडणुकीत वांद्रे मतदारसंघातून हरले. म्हणून राणेंनी पराभवाची हॅट्रीक चुकवायची असेल निवडणूक लढवू नये, असं केसरकर म्हणाले आहेत.

सिंधुदुर्गाचा असा इतिहास आहे, कितीही मोठा नेता असू द्या… एकदा हरला की तो परत निवडून येत नाही. त्यामुळे राणेंनी रिस्क घेऊ नये, असंही केसरकर म्हणाले आहेत. 

गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी जशी राणेंना पराभवाची धूळ चारली तशीच यंदाही ते निवडून येतील , असा विश्वास केसरकरांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या-

-कर’नाटकावर’ उद्धव ठाकरेंचा सामनातून हल्लाबोल; म्हणतात…

“भाजपचा सत्तेचा माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही”

-काँग्रेसला मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता करणार भाजपमध्ये प्रवेश???

-जोर का झटका जरा धीरेसे देऊ; भाजपचे मंत्री आणि आमदार आमच्या संपर्कात- नाना पटोले

-आमदार फोडण्यासाठी भाजप लालच दाखवतं; ममता बँनर्जींचा आरोप