“तुमचा परफॉर्मन्स दाखवा, नाहीतर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं”

मुंबई | भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. याला आता  शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

केंद्रात सातत्याने बदल होत असतो. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स दाखवा. नाही तर तुमचं मंत्रिपद जाऊ शकतं, असा टोला दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला आहे.

नारायण राणेंवर मला जास्त बोलायचं नाही. मात्र राणेंना केंद्रात चांगलं खातं मिळालं आहे. त्यांनी त्याचा वापर जिल्ह्यासाठी काय केला?, असा सवाल त्यांनी केला आहे.

सांगता येत नाही, कोणाचं करिअर कितीही मोठं असलं तरी केंद्रामधे सातत्याने बदल होत असतात. त्यामुळे तुम्ही जर परफॉर्मन्स नाही दाखवला तर तुमचं खातं जावू शकतं. केवळ राजकारण करून आपण टीकू शकतो का? याचा विचार राणेंनी केला पाहिजे, असंही नारायण राणेंनी म्हटलंय.

कोणतंही मंत्रीपद हे जनतेची सेवा करण्यासाठी असते. त्यांचंही करीयर मोजकचं असू शकतं. काहीच सांगता येत नाही, असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र सरकारची कारकिर्द शिल्लक आहे. आम्ही आमचा परफॉर्मन्स दाखवत आहोत. राणेंनी त्यांचा परफॉर्मन्स दाखवला पाहिजे. आधी आपण काय करू शकतो ते दाखवून द्या. मग आमच्यावर टीका करा, असं म्हणत त्यांनी राणेंना सुनावलं आहे.

पाच वर्षासाठी केंद्र सरकारला सत्तेत बसवलं आहे. त्यांना गुणवत्ता सिद्ध केली नाही तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असंही नारायण राणे म्हणालेत.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेत ते मुख्यमंत्रीच्या कारकिर्दीत किती चांगलं कामं करत आहेत हे लोकांना बघण्याचा अधिकार आहे. लोकांचा हा अधिकार तुम्ही का छिनून घेताय? असा सवाल करतानाच तुम्ही पैसे देऊन आमदार फोडाफोडी करता. मग तो भ्रष्टाचार नाही का?, असा सवालही नारायण राणेंनी केला आहे.

सरकार पाच वर्ष पूर्ण करेल असं मला वाटत नाही. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार नाही. यांना पाच वर्ष सत्ते राहण्याचा अधिकारही नाही. मंत्रिपदी बसायचाही अधिकार नाही. हे भ्रष्ट मंत्री आहेत. राज्याच्या हिताचं एकही काम होत नाही. त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, अशी टीका राणेंनी केली होती.

दरम्यान, माझ्या आयुष्यात कोणत्याच राज्यातील असा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. मला वाटतं राज कपूर नंतर यांचंच नाव घ्यावं लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजप नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट, ड्रग्ज प्रकरणात ट्विस्ट? 

…अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ 

‘हा देश कोरोना संसर्गाचं केंद्र ठरेल’; WHO ने दिला गंभीर इशारा 

राकेश झुनझुनवाला यांनी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये तासाभरात कमावले ‘इतके’ कोटी!

“हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल, त्यांना कळणारही नाही”