रत्नागिरी | नारायण राणे ज्या पक्षात जातात त्यांची सत्ता जाते, असा टोला त्यांनी लगावलाय. ही मोदींची भाजप राहिलेली नाही, ही राणेंची भाजप झालंय. यांनी इतकी पाप केली आहेत ते जातात त्या पक्षाची सत्ता जाते, अशी टीका दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर केली आहे.
दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर पुन्हा एकदा टीका केलीये. ते रत्नागिरीमध्ये माध्यमांशी बोलत होते.
नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख नाही, पण पुढचा धोका त्यांना होऊ शकतो. मोठ्यात मोठ्या माणसाची सत्ता घालवण्याची ताकद राणेंमध्ये असल्याचा टोला दीपक केसरकर यांनी लगावलाय.
देवेंद्र फडणवीस यांना नारायण राणेंना घेऊ नका म्हणून सांगत होतो. त्यांनी माझं ऐकलं नाही. मात्र, पुढं काय झालं ते आपण पाहिलयं म्हणत दीपक केसरकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटा काढलाय.
केंद्रीय मंत्री इथे येतो आणि म्हणतो कोणत्याही परिस्थितीत जिल्हाबँक जिंकणार म्हणतो त्यावेळी त्यांचे कार्यकर्ते सतीश सावंत यांच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करतात. असा रक्त रंजित इतिहास या पूर्वीसुद्धा झाला होता त्यावेळी श्रीधर नाईक यांचा बळी गेला होता, याची आठवण दीपक केसरकर यांनी करुन दिली.
पाच वर्षांपूर्वी या जिल्ह्यात उघड्यावर दंगली होत होत्या,तर कोण उद्योजक यायला तयार होत नव्हता मात्र आता बदल झालाय आता उद्योजक यायला लागले आहेत, असं दीपक केसरकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
कोरोनामुळे शरीरावर होतायेत गंभीर परिणाम; धक्कादायक माहिती समोर
“नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करू नये, तेवढी त्यांची उंची नाही”
“लग्नाला उशीर केल्यास मुली पॉर्न पाहत बसतील, त्यामुळे वयात आल्यावर त्याचं लग्न लावा”
“उद्धव ठाकरे हा व्यक्ती आयुष्यात कोणाचाच झालेला नाही”