“मुख्यमंत्री अनेक दिवस नीट झोपलेले नाहीत, ते रात्री…”

मुंबई | अनेक दिवस एकनाथ शिंदे झोपलेले नाहीत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जातात तेव्हा रात्री दोन-तीन वाजेपर्यंत लोक त्यांची वाट पाहत थांबलेले असतात. मग त्या लोकांना न भेटता निघून जाणं त्यांना योग्य वाटत नाही. म्हणून तीन वाजता ते एखाद्या ठिकाणी लोकांना भेटले आणि नंतर झोपायला गेले तरी पाच सहा वाजता झोपायचं मग सहा, सात वाजता उठायचं असं होतं. एक दोन तासांची झोप ही कोणालाही पुरेशी नसते. मात्र मुख्यमंत्री सातत्याने मागील आठ दिवसांपासून हे करत आहेत. ते अजिबात झोपत नाहीत, असं शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर म्हणालेत.

मी जेव्हा त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा मुख्यमंत्र्यांची नियमित आरोग्य तपासणी सुरु होती. ते आजारी नाहीत. मात्र त्यांनी स्वत:ची फार दगदग करुन घेतली आहे, असं केसरकरांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला. यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे दिवसभराचे कार्यक्रम रद्द केले होते. यावर केसरकरांनी प्रतिक्रिया दिली.

आपल्या तब्बेतीची काळजी घेतली तर ते लोकांची अधिक चांगली सेवा करु शकतील, असं माझं व्यक्तीगत मत असून मी हे त्यांना बोलून दाखवलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांना थकव्यामुळे विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याची माहिती समोर आली. मात्र केसरकारांनी या थकव्या मागील कारण हे अपुरी झोप असल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली आहे का?’, अमृता फडणवीस म्हणतात… 

‘गुजरात दंगलीतून नरेंद मोदींना…’; उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

“अखेर नड्डा देखील सब घोडे बारा टक्के निघाले”

भारतात 2024 पर्यंत अमेरिकेसारखे रस्ते होणार- नितीन गडकरी

उर्फीने कपड्यांऐवजी गुंडाळल्या तारा, पाहा व्हिडीओ.