“महाराष्ट्रात सध्या सुरक्षित वाटत नाही, केंद्राने आम्हाला सुरक्षा दिल्यास आम्ही तिकडे येऊ”

मुंबई | एकनाथ शिंदे गटाने (Eknath Shinde Group) गुवाहटीत आपली पहिली पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. इतकेच नाहीतर ही बंडखोरी करण्यामागे नेमकं काय कारण आहे याबाबतही गौप्यस्फोट केला आहे.

महाराष्ट्र येण्यासाठी केंद्राने आम्हाला सुरक्षा दिल्यास ती आम्ही स्वीकारू असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच मागच्या काळात जर माझे मंत्रीपद राऊतांमुळे गेले असेल तर आनंदच आहे असा टोला त्यांनी लगावला आहे.

पहिल्यापासून आमची भूमिका ही महाविकास आघाडी न करता भाजप बरोबर जाण्याची होती. शिवसेनेच्या नेतृत्वाची भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चाही घडवून आणण्याचा प्रयत्न मी केला. पण त्यात यश आले नाही, असंही त्यांनी सांगितलं.

राज्यातील काही मतदारसंघात शिवसेनेचे आमदार राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांना पराभूत करून निवडून आले. मात्र अडीच वर्षाच्या सत्तेच्या काळात त्यांना अधिकचा निधी दिला गेला आणि निवडून आलेल्या आमदाराला तसेच ताटकळत ठेवण्यात आले. हे आम्ही कसे काय खपवून घेऊ?, असा सवाल त्यांनी केला आहे.

बंडखोर आमदारांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सोबत आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी केली आहे. त्यातच आता दीपक केसरकर यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे.

आम्ही सुरू केलेली योजना अजितदादांनी बंद केली. जेव्हा ही योजना बंद केली त्याबाबत मी विचारणा केली असती तर अजितदादांनी सांगितलं की, माझ्या काही कारणास्तव ही योजना बंद करत आहे. जर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, ही योजना बंद करायची नाही तर मी ही योजना बंद करणार नाही, असं ते म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

शिवसेनेला पुन्हा मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याने दिला राजीनामा 

सर्वात मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार?; अत्यंत महत्त्वाची माहिती समोर 

‘…पण त्यांनी आता शिवसेनेच्या आईवरच हात घातला’, किशोरी पेडणेकरांचा घणाघात 

“कुठलाही गद्दार बाळासाहेबांचं नाव वापरू शकत नाही, मतं मागायचीच असतील तर…”

मोठी बातमी! मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू