“राणे ट्वीटरवरून राज्य चालत नसतं”

सिंधूदुर्ग | ट्वीटरवरून राज्य चालतं असा गैरसमज करून घेऊ नये, असा खोचक टोला शिवसेना आमदार दीपक केसरकार यांनी भाजप आमदार नितेश राणेंना लगावला. ते सावंतवाडीमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषेदत बोलत होते. यावेळी केसरकर यांनी नितेश राणेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

काही जणांना वाटतं की बैलगाडी जी चालली आहे. ती मागे बांधलेल्या कोकरूमुळेच चालते पण तो भ्रम असतो. त्यामुळे कोणाच्या ट्वीटमुळे राज्यात निर्णय होत नाही, अशा शब्दात दीपक केसरकर यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला आहे.

सिंधुदुर्गमधील कुठल्याही विकासकामांना स्थगिती दिली नाही. फक्त नवीन सरकार आल्यावर पूर्ण सरकारच्या कार्यप्रणालीचा अभ्यास करून तसेच सध्या कुठल्या गोष्टीला प्राधान्य दिलं गेले पाहिजे हे पाहून काही निर्णय घ्यावे लागतात, असं केसरकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून नितेश राणे हे शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर ट्वीटरवरून टीका करत आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या टीकेला दीपक केसरकर यांनी उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या-