“म्याव म्याव करणारे लपून बसलेत, गुन्हेगार लोक नेहमीच…”

मुंबई | शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यातील वाद चांगलाच वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. शिवेसेनेनं राणे यांच्यावर जोरदार टीका करायला सुरूवात केली आहे.

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधक भाजपमध्ये जोरदार वाद होत आहे. तर सभागृहाच्या पायऱ्यावर नितेश राणे यांनी केलेल्या एका चुकीच्या वक्तव्यानं त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.

आदित्य ठाकरे हे सभागृहात जात असताना राणे यांनी मांजराचा आवाज काढत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. परिणामी सभागृहात राणे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी शिवसेनेनं लावून धरली आहे.

राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना आमदार दिपक केसरकर यांनी राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विधानसभेच्या पायऱ्यावर बसून मांजराची नक्कल करणारे आता मांजरासारखं लपून बसले आहेत, अशी टीका केसरकर यांनी केली आहे.

नितेश राणे सध्या संतोष परब हल्ला प्रकरणात अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राणे यांनी राजकीय सुडबुद्धीतुन माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप परब यांनी केला होता. त्यानंतर राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परिणामी सध्या राणे कुटुंबाची बरीच धावपळ होत आहे.

नितेश राणे विधानसभेच्या पायऱ्यावर बसून मांजराचा आवाज काढत होते. ते वाघाला किंवा न्यायालयाला घाबरून लपून बसले आहेत. कोणी गुन्हा केला माहिती नाही पण गुन्हेगार लोक नेहमीच कायद्याला घाबरत असतात, असा टोला केसरकर यांनी लगावला आहे.

म्याव म्याव करत दुसऱ्यांना चिडवल की अशीच लपायची वेळ येते. म्हणून आपली वागणूक चांगली ठेवायला हवी, असं दिपक केसरकर यांनी सिंधुदुर्गात पत्रकाराशी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, सध्या नितेश राणे यांच्या शोधात पोलिसांची दोन पथकं गोव्यात दाखल झाली आहेत. नितेश राणे हे अटकपुर्व जामीन मिळावा म्हणून प्रयत्न करत आहेत. परिणामी राणे यांच्या प्रकरणाकडं अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

“पुढची 25 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत”

राज्याला अवकाळी पाऊस झोडपणार; ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

“वडिलांच्या खांद्यावर बसूनही अजित पवार यांच्या नाकापर्यंत उंची भरणार नाही”