‘मनसे म्हणजे एक आमदाराची अगरबत्ती’, भोगामंत्री म्हणत दीपाली सय्यद यांनी पुन्हा मनसेला डिवचलं

मुंबई | महाराष्ट्रातील सत्तानाट्यात मनसेनं आता अधिकृतपणे उडी घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेसह उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली होती.

शिंदे गट मनसेत विलीन होणार असल्याच्या चर्चा रंगत असताना राज ठाकरेंनी सूचक वक्तव्य देखील केलं होतं. अजूनतरी शिंदे गटाकडून असा प्रस्ताव आला नाही. मात्र असा प्रस्ताव आला तर नक्की विचार करू, असं राज ठाकरे म्हणाले.

मनसेच्या टीकेवर आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मनसे म्हणजे एक आमदाराची अगरबत्ती म्हणत दीपाली सय्यद यांनी मनसेला डिवचलं आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मनसेनं स्थापन केलेल्या शॅडो कॅबिनेटवरून व राज ठाकरेंच्या रद्द झालेल्या आयोध्या दौऱ्यावरूनही दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे.

अमित म्हणजे कार्यकर्त्यांना सोडुन घरी बसलेला मुख्यमंत्री, असा टोला दीपाली सय्यद यांनी लगावला आहे. तर शॅडो कॅबिनेटने अयोध्येला जाता येत नसते रे भोंगामंत्री, असा घणाघात देखील दीपाली सय्यद यांनी केला आहे.

दरम्यान, तुम्ही गृहमंत्री तर ब्रिजभूषण कोण तुमचा संरक्षण मंत्री?, असा सवाल देखील सय्यद यांनी ट्विट करत विचारला. गेल्या काही दिवसांपासून दीपाली सय्यद सातत्याने मनसेवर टीका करत आहेत. त्यात त्यांनी आणखी एकदा मनसेला डिवचलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“संजय राऊतांबद्दल काय विचारता, सेन्सिबल माणसाविषयी विचारा”

रणवीर सिंगच्या न्यूड फोटोंची पूनम पांडेकडून प्रशंसा, म्हणाली…

‘मिस्टर फडणवीस…’, संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

“शिवसेना फुटल्याचं फुकटचं श्रेय फडणवीसांनी घेऊ नये, ते श्रेय उद्धव ठाकरेंचच”

उरल्या सुरल्यांचं काय ऐकायचं म्हणत नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले…