मुंबई | भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांनी एका चर्चेदरम्यान इस्लामचे संस्थापक प्रेषित महंमद यांच्याबद्दल कथित अपमानजनक टिप्पणी केली होती. यानंतर देशातील वातावरण ढवळून निघालं होतं.
मुस्लिम समुदायांनी जोरदार आक्षेप घेऊन निषेध केला; तसेच काही देशांमध्ये भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन करणारे ट्विटर ट्रेंडही पुढे आले. भारताने माफी मागावी अशी मागणी अनेक देशांनी केली.
विरोधकांनी या प्रकरणावरून केंद्रातील भाजप सरकावर सडकून टीका केलीये. आता शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी यावरून सरकावर निशाणा साधला आहे. देश झुकणार नाही, भाजपच्या पापात देश सामील होणार नाही, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलंय.
संभाजीनगर हे नाव आम्ही अभिमानाने घेत आहोत पण नुपूर शर्मा मुळे देशाचं नाव खराब होता कामा नये. देश नही झुकने दुंगा विसरलात का? भाजपच्या मोठाभाईला माफी मांगायला सांगा तुमच्या पापात देश सहभागी होणार नाही, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहंमद पैगंबरांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे जागतिक पातळीवर भारतााची प्रतिमा खराब झाली. नुपूर यांना पदमुक्त करण्यात आलं त्याच मुद्द्यावरून दिपाली सय्यद यांनी भाजपला घेरलंय. तसंच अमित शाहा यांना माफी मागण्याचं आव्हान दिलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
खळबळजनक! न्यूड व्हिडीओ व्हायरल झालेल्या खासदाराचा घरी सापडला मृतदेह
“आता माझा नंबर असेल, कारण जो कोणी तुमच्या विरोधात बोलणार त्याला…”
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची अतिविराट सभा पाहून टीका करणाऱ्यांची बुबूळं बाहेर आली असतील “
राज्यावर अस्मानी संकट; ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार
“रोज स्वप्नात उद्या सरकार पडणार असं येतं आणि…”; मुख्यमंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीसांना चिमटे