“राजकारण करण्याच्या नादात आपले संस्कार विसरून गेलेत”

पुणे | शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. त्या मावळमध्ये माध्यमांशी बोलत होत्या.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा अतिशय निंदनीय आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. राजकारण करण्याच्या नादात आपले संस्कार विसरून गेले आहेत, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे.

ज्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात त्या बसून बोलून हक्काने मागून घ्यायला पाहिजे. त्यासाठी एखाद्या ज्येष्ठ नेत्याच्या घरावर हल्ला करणं हे योग्य नसल्याचं दिपाली सय्यद यांनी म्हटलंय.

प्रत्येक जाती धर्माचा आपण सन्मान करतो. हे करत असताना फक्त आमचीच जात किंवा धर्म मोठा अस बोलून किंवा वागून चालणार नाही तर समाजात शांतता आणि आदर राखणे महत्वाचे आहे’ असं म्हणत दीपाली सय्यद यांनी सध्या सुरू असलेल्या मशिदीचे भोंगे आणि हनुमान चालीसा यावर राज ठाकरेंना टोला लगावला

विरोधकांना असं वाटतंय की ED चौकशी बसवली की महाविकास आघाडीच्या नेत्यांना आपण संपवून टाकू शकतो आणि मी परत जाऊन त्या खुर्चीवर बसू शकतो. त्यासाठी हा सगळा प्रकार सुरू आहे. परंतु हे सगळ्यांना समजतंय आणि दिसतंय. ते देखील धुतल्या तांदळातले नाहीयेत, अशी टीका दीपाली सय्यद यांनी केली आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी ईडी हे एक शस्त्र बनवलं आहे. काही झालं की फक्त ईडीचा बाण सोडत आहेत, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

“मातोश्रीत बसलेल्यांनी सभेला लाखोंची गर्दी जमवून दाखवावी” 

सिनेसृष्टीला मोठा धक्का; प्रसिद्ध अभिनेते शिवकुमार सुब्रमण्यम यांचं निधन 

“वेळ जवळच आहे, आता काही फार दिवस नाहीत” 

“माथेफिरू गुणरत्नांना मांडीवर घेऊन आग लावणारे महाराष्ट्राचं नुकसान करतायेत” 

महाराष्ट्राला हादरवलेल्या चंद्रपूरपमधील ‘त्या’ मुलीच्या हत्येमागचं धक्कादायक सत्य समोर!