“राजसाहेब लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर…”

मुंबई | शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलं आहे. दिपाली सय्यद यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

दिपाली सय्यद यांनी विधान परिषद निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस एकटेच पडू नयेत म्हणून राज ठाकरेंनी लवकर बरं व्हावं असं म्हटलंय. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

माननीय राजसाहेब आपण लवकरात लवकर बरे व्हा, नाहीतर विधानपरिषद निवडणुकीनंतर फडणवीस साहेब एकटे पडतील, असं दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दिपाली सय्यद यांनी या ट्विटमध्ये स्वत:च्या पक्षासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र भाजपचं ट्विटर हॅण्डलही टॅग केलं आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

दरम्यान, मागील काही काळापासून त्यांच्या वक्तव्यांमुळे विशेष चर्चेत राहिलेल्या आहेत, असंच एक वक्तव्य आता त्यांनी पुन्हा एकदा केलं आहे.

राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंगाविरोधी भूमिका घेतल्यापासून वेळोवेळी दिपाली सय्यद यांनी मनसेविरुद्ध भूमिका घेतली आहे. तसेच त्यांनी अनेकदा भाजपचे वरिष्ठ नेते, त्यामध्ये अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेकांवर टीका केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

अग्निवीरांचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजप देणार नोकरी, ‘या’ नेत्याची मोठी घोषणा 

‘त्या मावळ्याचा बळी जाणार’; भाजप नेत्याच्या ट्विटने चर्चांना उधाण 

3 आमदारांनी राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली?; महत्त्वाची माहिती समोर  

“मी जिंकलोय याची आजच खात्री देतो, संध्याकाळी मुलाखत देईन” 

“मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय मला फरक पडत नाही, कारण…”