मुंबई | प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील लागलेले भोंगे खाली उतरावावे लागतील, हा निर्णय सरकारने घ्यावा लागले. निर्णय नाही घेतला तर मशिदींसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महविकास आघाडी सरकारला दिला आहे.
शिवाजी पार्क येथे सुरू झालेल्या गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला आहे.
यावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहे. काहींनी राज ठाकरेंच्या वक्तव्याचं समर्थन केलंय तर काहींनी यावरून राज ठाकरेंवर जोरदार टीका केलीये. आता यावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिलीये.
राजजींचं हे वक्तव्यं मला पटलेलं नाही. हे बोलून तुम्ही दंगली करत आहात वाद करत आहात. प्रत्येकाचा धर्म त्याच्यासाठी मोठा किंवा महत्त्वाचा असतो, असं त्या म्हणाल्यात.
जर तुम्हाला या गोष्टीचा त्रास होतो ना तर न्यायालय आहे, तिथे जा या आधी तिहेरी तलाकवर निर्णय मिळाला आताही मिळेल, अस त्या म्हणाल्या.
मला असं वाटतं की त्यांनी जर ही गोष्ट त्या पद्धतीने केली असती ना तर ते उत्तम झालं असतं, असं म्हणत दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताच्या ‘त्या’ निर्णयावर अमेरिकेचा संताप; दिला ‘हा’ गंभीर इशारा
पुढील 4 दिवस महत्त्वाचे! कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पावसाचा इशारा
गडकरी म्हणाले, “रोहित तू बिंधास्त जा, तुझं काम झालंच म्हणून समज”
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”