मुंबई | राज्यात सध्या विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. अशात केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या दौऱ्यावरून राजकारण पेटलं आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस, काॅंग्रेसच्या महिला आघाडीकडून पुण्यात जोरदार प्रदर्शन करण्यात आलं होतं. यावेळी मोठा राडा झाल्याचं देखील समोर आल्यानं आता वाद वाढला आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलल्यानं राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजपवर या प्रकरणावरून जोरदार टीका केली आहे.
महिलांवर हात उचलाल तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावू, अशी जहरी टीका सय्यद यांनी भाजपवर केली आहे. परिणामी वाद वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी तत्कालिन आघाडी सरकार असताना पंतप्रधान मनमोहन सिंग यांना बांगड्या पाठवल्या होत्या. यावरून आता आघाडीकडून हे आंदोलन करण्यात आलं.
दिपाली सय्यद यांनी स्मृती इराणी यांच्यावर देखील जोरदार टीका केली आहे. केंद्रातील म्हैस अशी उपमा इराणी यांना सय्यद यांनी दिला आहे. परिणामी वाद वाढण्याची शक्यता आहे.
केंद्रातल्या जर्शी म्हशीला गोबर गॅसची आठवण करून देऊ. जसे पेराल तसे ऊगवुन देऊ, असा इशारा दिपाली सय्यद यांनी भाजपला दिला आहे.
पाहा ट्विट –
महिलांवर हात उचलाल तर तुमच्या दिल्लीच्या बापालाही माफी मागायला लावु , केंद्रातल्या जर्शी म्हशीला गोबर गॅसची आठवण करून देऊ. जसे पेराल तसे ऊगवुन देऊ. @MumbaiNCP @supriya_sule #smrutiirani
— Deepali Sayed (@deepalisayed) May 16, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
“स्वत:च्या बायकोला लोक बोलली तर इतरांना पुढं करता का?”
“कारवाई न झाल्यास जशास तसं उत्तर देऊ”; देवेंद्र फडणवीस आक्रमक
“मुख्यमंत्र्यांच्या सत्तेच्या ढाचा पाडल्याशिवाय शांत बसणार नाही”
“कौरवांची सभा काल झाली आज पांडवांची सभा आहे”; फडणवीसांचा हल्बाबोल
“मुख्यमंत्र्यांची कालची सभा मास्टर सभा नसून लाफ्टर सभा होती”