दिपाली सय्यदचा मुलासोबतचा भन्नाट डान्स सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

मुंबई |  आज काल आपण अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहतो. त्यात लहान मुला-मुलींचे व्हिडीओही आपल्या पाहायला मिळतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात.

अभिनेता अभिनेत्री वारंवार आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घटना आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. तसेच अनेक सेलिब्रिटी आपल्या डान्सचे व्हिडीओही वारंवार शेअर करत असतात.

मराठी सिनेमासृष्टीची अभिनेत्री आणि एक उत्कृष्ट डान्सर दिपाली सय्यद सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. तिच्या अभिनयासोबत तिच्या डान्समुळेही ती खूप फॅमस आहे. अशातच दिपाली सय्यदचा आणि तिच्या मुलाचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिपाली आणि तिचा मुलगा एका गाण्यावर डान्स करताना दिसतं आहेत. तिच्या मुलाचे नाव अलि सय्यद असून दोघं मायलेकं चांगलीच ‘तू तू है वही’ या  रोमॅॅॅॅॅॅॅॅॅॅन्टिक गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

दिपाली तर एक चांगली डान्सर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. परंतू या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तिचा मुलगा अलिही काही कमी नसल्याचं दिसून येतं आहे. तसेच त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ दिपालीने आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवरून ‘जागतिक डान्स डे’च्या दिवशी शेअर केला आहे. शेअर करताना तिने ‘Verified TU…TU…HAI WOHI Darling Noughty Adorable DNA MERA SON MY LIFE’S EVERY DAY IS SONDAY WISH YOU ALL HAPPY WORLD’S DANCE DAY’असं कॅप्शनही दिलं आहे.

त्याच्या या व्हिडीओला अनेकांनी कमेंन्ट केलं आहे. तसेच त्या दोघांचा एकत्रित डान्स अनेकांना आवडत असून आतापर्यंत या व्हिडीओला जवळजवळ 7 हजार लोकांनी लाईक केलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Deepali bhosale sayed (@deepalisayed)

महत्वाच्या बातम्या-

‘वडिलच स्वतः सांगतात गडद रंगाची बिकिनी घे…’,…

अरे बापरे! बाळाला जन्म देईपर्यंत महिलेला माहितीच नव्हतं ती…

कोरोना काळात आई-वडिलांना गमावलेल्या मुलांसाठी धावून आली…

‘या’ अष्टपैलू खेळाडूनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून…

IPL 2021: टीममधून काढल्यानंतर डेव्हिड वॉर्नरला अश्रू अनावर,…

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More

Privacy & Cookies Policy