‘किधर छुप्या है अमित ठाकरे…’; दिपाली सय्यद यांची राज ठाकरेंवर टीका

मुंबई | शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनंतर त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यावर निशाणा साधाला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यांच हे ट्विट सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

तुम्हारे कार्यकर्ताओंको ये जो धरपकड्या है । उसमे आपके अमित ठाकरे को वगळ्या है । किधर छुप्या है अमित ठाकरे बतावो सबको, असं दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.

याआधीही दिपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर टीका केली होती. मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला आणि मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही, असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लगावला होता.

दरम्यान, सय्यद यांच्या या ट्विटला मनसेचे प्रवक्ते आणि सचिव योगेश खैरे यांनी त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे.

तुम्या मालूम नही रहेग्या… नया नया पॉलिटिक्स आया है ना….राज ठाकरे साहेब घर मै बैठा के फेसबुक लाईव करने वाले लीडर नही है…. सौ से ज्यादा आंदोलन के केस है उनपे… जरा मालूमात किया तो बरा रहेगा! नया है आप, असं ट्विट करत त्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय.

 

 

महत्त्वाच्या बातम्या- 

“ज्यांना घरातून बाहेर काढलं, त्यांच्यावर काय बोलू?, त्यांची लायकी नाही”

बाथरूममध्ये SEX करण्याची इच्छा जीवावर बेतली; अत्यंत धक्कादायक प्रकार समोर 

“शरद पवार मोठ्या मनाचा माणूस, त्यांनी 5 वेळा माफी मागितली असती” 

“माझी उंची मोठी म्हणून मी हवेत, जास्त टीका करू नका नायतर…” 

मोठी बातमी! महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर