मुंबई | अभिनेत्री दीपिका पदुकोण सुशांत सिंह राजपूत प्रकरणामुळे ड्र.ग्जच्या कनेक्शनमध्ये फसण्याची शक्यता दिसत आहे. २०२० हे वर्ष दीपिका पदुकोणसाठी चांगले गेले नाही. जिथे चित्रपट, विविध कार्यक्रमाची चर्चा व्हायला हवी, तिथे दीपिका पदुकोणबाबत आता या नवीनच वा.दावर चर्चा होत आहे.
दीपिका पदुकोण जेएनयूमध्ये गेली, त्यावरून अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर तिच्यावर टी.केची झो.ड उठवली होती. त्यातच आता नुकतेच ड्र.ग्ज कनेक्शन समोर आले आहे. यामुळे दीपिका पदुकोणच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील प्रतिमेला ध.क्का बसण्याची शक्यता आहे.
कॉर्पोरेट क्षेत्रात दीपिका पदुकोणबाबत अनेक चर्चा होत आहे. याचा परिणाम थेट तिच्या मार्केट मूल्यावर होऊ शकतो. एका काळात मार्केट मूल्याबाबत बोलायचे झाले तर बॉलिवूडचे मोठ-मोठे अभिनेते शाहरुख खान, सलमान खान आणि अमीर खान यांचा दबदबा होता.
पण मागील तीन वर्षांपासून दीपिका पदुकोण, विराट कोहली आणि अक्षय कुमार हे देशातील सर्वात जास्त विकले जाणारे ब्रँड आहेत. आता हे ड्र.ग्जचे प्रकरण दीपिका पदुकोण कसे सांभाळते?, यावर सारं काही अवलंबून आहे.
दीपिका पदुकोणचे चित्रपट आणि ब्रँड यांना सोबत जोडले तर याची एकुण आकडेवारी जवळजवळ १०० कोटींच्या घरात आहे. दीपिका पदुकोण एका जाहिरातीच्या शुटिंगसाठी तब्बल ८ कोटी रुपये घेते, यात तिचा क्रमांक बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये ती सर्वात वरच्या स्थानावर आहे.
अक्षय कुमार आणि विराट कोहली ब्रँडच्या मूल्यामध्ये दीपिका पदुकोणपेक्षाही पुढे आहेत. दीपिका पदुकोणनंतर जर कोणती अभिनेत्री ब्रँडच्या मूल्याबाबत असेल तर त्यात आलिया भटचा क्रमांक लागतो.
दीपिका पदुकोणचा छपाक चित्रपट आला होता, त्यानंतर जेएनयुचा वाद निर्माण झाला आणि छपाक चित्रपट फ्लॉप झाला. यामुळे तिच्या ब्रँड मूल्यालाही याचा चांगलाच धक्का बसला होता. अभिनेता रणवीर सिंहबरोबर लग्न केल्यावरही दीपिका पदुकोण चर्चेत होती.
लग्नानंतर दीपिका पदुकोण चित्रपट क्षेत्रातील काम खूपच कमी झाले आहे. त्यातच दीपिका पदुकोण आता दिग्दर्शकही झाली आहे. दीपिका पदुकोण ब्रँड मूल्याच्या बाबतीत २१ देशांची जोडली गेलेली आहे. जगप्रसिद्ध फोर्ब्सच्या यादीत सर्वात जास्त पैसे कमावणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत दीपिकाचा क्रमांक पहिल्या १० जणींमध्ये आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कशाला घाबरतोय सलमान खान? सलमाननं स्वतःच केला मोठा खुलासा म्हणाला…
कंगना राणावत आणि महेश भट्ट यांचा ‘तो’ फोटो व्हायरल, राखी सावंत म्हणाली…
दीपिकाच्या ‘त्या’ व्हॉट्सअप ग्रुपबाबत मोठी माहिती समोर, ज्यामध्ये लिहिलं होतं ‘माल है क्या?’
…म्हणून ‘ही’ अभिनेत्री अक्षय कुमार समोर कपडे काढायला तयार झाली होती
रिलायन्सच्या मुकेश अंबानींचं एक पाऊल पुढे; आता इंग्रजांची ‘ही’ बडी कंपनी घेणार ताब्यात!