मुंबई | अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणातील ड्र.ग्जच्या कनेक्शनबाबत अनेक कलाकारांची नावं समोर आली आहेत. अभिनेत्री कंगना राणावत बॉलिवूडच्या ड्र.ग्ज प्रकरणावर बोलली होती, त्यानंतर तिने अनेक कलाकारांवर आरोप केले. त्यामध्ये चौकशीत दीपिका पदुकोण, रकुल प्रीत सिंह, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची नावं समोर आली आहेत.
सध्या अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. कारण या ड्र.ग्ज प्रकरणाच्या तपासात दीपिका पदुकोणबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्या व्हाट्स अॅप चॅटमध्ये तिने मा.ल आहे का, असं विचारलं होतं, त्या ड्र.ग्जच्या व्हाट्स ग्रुपची दीपिका पदुकोण ही अॅडमीन आहे, अशी माहिती समोर आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार दीपिका पदुकोण त्या ग्रुपमध्ये २०१७ पासून आहे. तेव्हापासूनच दीपिका पदुकोण ड्र.ग्जची मागणी करत होती का?, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
आता यामुळे दीपिका पदुकोणच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तसेच त्या ग्रुपमध्ये जया शहा आणि करिष्माही होत्या. एन.सी.बीने येत्या शनिवारी दीपिका पदुकोणला चौकशीसाठी बोलावले आहे.
एन.सी.बीने करिष्माला शुक्रवारीच चौकशीसाठी बोलावले होते. दीपिका पदुकोण ड्र.ग्जची चर्चा झालेल्या व्हाट्स अॅप ग्रुपची अॅडमीन होती आणि त्यावर ड्र.ग्जबाबत चर्चाही झाली, यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
ड्र.ग्जच्या या प्रकरणात बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्री फसण्याची शक्यता दिसत आहे. तसेच त्यांची त्यातील सक्रिय भूमिका समोर आल्याने त्यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
या सर्व प्रकरणाबाबत एन.सी.बी दीपिका पदुकोणला अनेक प्रश्न विचारू शकते. दीपिका पदुकोणची चौकशी शुक्रवारी होणार होती, पण नंतर त्यांनी निर्णय बदलून शनिवारी चौकशीसाठी बोलावले आहे.
शुक्रवारी रकुल प्रीत सिंहची बराच वेळ चौकशी चालली होती. यात आता एन.सी.बीच्या रडारवर बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. एन.सी.बी दीपिका पदुकोणला कोणते प्रश्न विचारणार आहे, त्याची त्यांनी यादी केली आहे, त्या आधारे प्रश्न विचारणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून ‘ही’ अभिनेत्री अक्षय कुमार समोर कपडे काढायला तयार झाली होती
रिलायन्सच्या मुकेश अंबानींचं एक पाऊल पुढे; आता इंग्रजांची ‘ही’ बडी कंपनी घेणार ताब्यात!
दोन कॅच सोडल्याने सामना गमवावा लागला; आता कोहलीला दंडही भरावा लागणार!
सुशांतसिंग प्रकरण : कोण आहे सिमोन खंबाटा?, का आली एनसीबीच्या रडारवर?
पैशाच्या हव्यासापोटी मित्राला बायकोसोबत जे करायला लावलं त्यानं प्रत्येकाचा थरकाप उडेल!