महाराष्ट्र मुंबई

…म्हणून लक्ष्मण मानेंविरोधात 35 कोटींचा मानहानीचा दावा दाखल

मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते अब्दुल रहमान अंजरिया यांनी लक्ष्मण माने यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्यावर ३५ कोटींच्या मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मण माने यांनी आपल्यावर खोटे तसंच तथ्यहीन आरोप केल्याचा दावा अब्दुल रहमान अंजरिया यांनी केला आहे. लक्ष्मण माने यांनी अब्दुल रहमान अंजरिया यांच्यावर आरोप केले होते.

लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी, अशी मागणीही अब्दुल रहमान अंजरिया यांनी केली आहे.

अंजरिया यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आणि भाजपामध्ये काम केल्याचे आरोप लक्ष्मण माने यांनी केले आहेत. अंजरिया यांनी वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. यावरही लक्ष्मण मानेंनी आक्षेप घेतला होता.

लक्ष्मण माने यांनी केलेले सर्व आरोप खोटे आणि तथ्यहीन असल्याचा दावा अंजरिया यांच्याकडून करण्यात आला आहे. तसंच वकिलांच्या मार्फेत ३५ कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.

पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण माने यांनी आपल्यावर केलेल्या आरोपांबद्दल माफी मागावी, अशी मागणीही यावेळी अंजरिया यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कर्नाटकचं राजकीय नाट्य अखेर संपलं; कुमारस्वामी सरकार कोसळलं

-अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची भेट द्या; धनंजय मुंडेंचं भावनिक आवाहन

-“नितीन गडकरी देशात सर्वात चांगलं काम करणारे मंत्री”

-“भाजपने नाही तर बंडखोरांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला”

-पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत भेटायला आला ‘हा’ खास मित्र

IMPIMP