मॉडेलला प्रवास करायला राज्यपालांनी मदत केल्याचं वृत्त; मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल

मुंबई | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या संदर्भात खोटं व बदनामीकारक वृत्त वेब पोर्टल वर प्रसिद्ध करून समाज माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी गुरूवारी राज्यपालांच्या वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथील मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे कक्ष येथे तक्रार नोंदविण्यात आली.

एका मॉडेल अभिनेत्रीसाठी विशेष पासची व्यवस्था करून देऊन महाराष्ट्रातून दिल्लीमार्गे देहरादून येथे प्रवास करण्यास मदत केल्याचं असत्य व बदनामीकारक वृत्त सदर वेबपोर्टलने प्रसिद्ध केले होते, या संदर्भात ही तक्रार दाखल करण्यात आली.

तक्रार दाखल केल्याची माहिती राजभवन महाराष्ट्राच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली आहे. संबंधित वृत्तातून राज्यपाल महोदयांची बदनामी झाल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

राजभावनाने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे संदर्भात खोटे व बदनामीकारक वृत्त वेब पोर्टल वर प्रसिद्ध करून समाज माध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी आज राज्यपालांचे वतीने बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथील मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे कक्ष येथे तक्रार नोंदविण्यात आली”.           दरम्यान, हे खोटं व बदनामीकारक वृत्त कुणी आणि काय दिलं? याचा तपास पोलिस करत आहेत.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-बिनविरोध आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचं कार्यकर्त्यांना आवाहन

-देवेंद्र फडणवीसांनी औरंगाबादेत गुपचूप उरकली बैठक, ‘या’ विषयावर चर्चा झाल्याची शक्यता

-…म्हणून मला उमेदवारी दिली नसेल- चंद्रशेखर बावनकुळे

-पायी जाणार्‍या मजुरांना पाणी, जेवण उपलब्ध करून द्या; आंबेडकरांचं कार्यकर्त्यांना आवाहन

-…म्हणून रणजितसिंह मोहितेंना तिकीट दिलं; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण