IPL 2022 | श्रेयसच्या KKR ची विजयी सलामी; चेन्नईचा पराभव

कोलकाता | इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सलामीच्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने विजयी शुभारंभ केला आहे. चेन्नई सुपर किंग्सला त्यांनी सहा विकेट राखून सहज पराभूत केलं.

कोलकाताच्या फलंदाजांनी 132 धावांचं लक्ष्य 18.3 षटकात आरामात पार केलं. केकेआरकडून मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 44 धावा केल्या.

श्रेयस अय्यर आणि शेल्डन जॅक्सनच्या जोडीने केकेआरच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. चेन्नई आजच्या सामन्यात आपल्या तीन प्रमुख खेळाडू शिवाय उतरला होता.

या तिघांची उणीव चेन्नईला जाणवली. दीपक चाहर, मोइन अली आणि ड्वेन प्रिटोरियस हे तीन खेळाडू आजच्या सामन्यात नव्हते.

केकेआरचा कॅप्टन श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला.

चेन्नई इतकी कमी धावसंख्या करेल अशी अपेक्षा नव्हती. खरंतर महेंद्रसिंह धोनीने चेन्नईची लाज वाचवली.

अवघ्या 61 धावात चेन्नईचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यावेळी धोनीने रवींद्र जाडेजासोबत संयमी फलंदाजी केली व अखेरच्या काही षटकांमध्ये आपल्या बॅटचा तडाखा दाखवला. त्यामुळे चेन्नईला 130 धावसंख्येपर्यंत पोहोचता आले.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘सेलिब्रिटी होणं इतकं सोपं नसतं’; हेमांगीनं शेअर केला ‘तो’ व्हिडीओ 

  ‘कुणीही कायदा हातात घेतला तर…’; गृहमंत्र्यांचा गंभीर इशारा 

  “माझ्या हत्येचे कटकारस्थान रचले जात आहे”

  “आता बाॅलिवूड, टाॅलिवूड म्हणण्याऐवजी ‘इंडियन फिल्म इंडस्ट्री’ म्हणावं” 

  Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद