Top news देश

देशाच्या संरक्षणमंत्र्यांनाही आवरेना ‘पुष्पा’चा मोह, म्हणाले “फ्लावर भी और फायर भी”

Rajnath sinh

नवी दिल्ली । तमिळ चित्रपट ‘पुष्पा’ची क्रेज अजूनही सोशल मीडियावर कायम असल्याचं पहायला मिळत आहे. अल्लू अर्जुनच्या स्टाईलपासून ते डायलॉगपर्यंत सगळ्याच गोष्टीने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

उत्तराखंडमधील गंगोलीहाटमध्ये झालेल्या एका जाहीर सभेमध्ये जनतेला संबोधित करत असताना देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पुष्पा चित्रपटातील डायलॉग सीएम पुष्कर सिंह धामी यांच्या नावाशी जोडून एक वेगळ्याच पध्दतीने सादर केल्यामुळे चांगलीच चर्चा रंगल्या आहेत.

आजकाल सगळीकडेच पुष्पा नावाची चर्चा खुपच होत आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांचे नाव देखील पुष्कर आहे. पण काँग्रेसने पुष्कर हे नाव एकूण फुल समजू नये, असं राजनाथ सिंग म्हणाले आहेत.

मला त्यांना सांगायचंय की आमचा पुष्कर नुसता फुल नसून फायर आहे, असा थेट इशारा राजनाथ सिंह यांनी विरोधकांना दिला आहे. त्यावेळा मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं की, आमचं पुष्कर कधीच हारणार नाही आणि माघारही घेणार नाही.

यावेळी मंत्री राजनाथ सिंह यांनी काँग्रेस पक्षावरही जोरदार टीका केली. काँग्रेसला मी आदरपुर्वक सांगतो की त्यांच्याकडे पक्षाला वाढवण्यासाठी कोणतेही धोरण नाही. त्यांच्या विकास कामावरतीही माझा विश्वास नाही, असं राजनाथ सिंह म्हणाले.

काँग्रेस पक्षाने सत्ता असल्यानंतर देशाची आणि राज्यांची नेहमीच लुट केली आहे. त्यामुळे देशातील जनतेने त्यांना सत्तेपासून दुर केलं आहे. त्यामुळे आम्ही आता उत्तराखंडला झुकू देणार नाही. असं वक्तव्य संरक्षणमंत्र्यांनी केलंय.

उत्तराखंडमध्ये काँग्रेसची अवस्था अशी आहे की ते आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री देखील घोषित करु शकले नाहीत, जोरदार टीकास्त्र देखील त्यांनी यावेळी सोडलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

झिका व्हायरसचा कम्युनिटी स्प्रेड झालाय?, अत्यंत धक्कादायक माहिती समोर

IPL Auction 2022: मेगा लिलावापूर्वी रिकी पाँटिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला…

तरुण पिढीत वेगानं पसरतोय ‘हा’ आजार; सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय व्हिडीओ

IPL Auction 2022: बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय; ‘या’ 3 खेळाडूंच्या गोलंदाजीवर बंदी

उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कहर; तर राज्यातील ‘या’ भागात अवकाळी पावसाची शक्यता