इंधनांच्या किंमतींमुळे गाडी चालवणं परवडत नाही? मग पेट्रोल-डिझेल वाचवण्यासाठी ‘या’ ट्रिक्स नक्की वाचा…

नवी दिल्ली | अलिकडे काही वर्षांमध्ये इंधनांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. इंधनांच्या वाढत्या भावांमुळे वाहन चालवणे सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. इंधनांच्या किंमती आपल्या हातात नसल्या तरी इंधनाची बचत करणे आपल्या हातात आहे. यामुळे आज आम्ही तुम्हाला इंधन वाचवण्यासाठी काही ट्रिक्स सांगणार आहोत.

वाहनातील इंधन वाचवण्यासाठी सर्वप्रथम वेगावर नियंत्रण ठेवा. इंधन बचत करण्यासाठी वाहनाला एकाच वेगात चालवणं फायद्याचं ठरतं. गाडीचा अचानक वेग वाढवल्याने किंवा अचानक ब्रेक दाबल्याने जास्त इंधन लागतं. यामुळे नेहमी गाडी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करावा.

गाडीच्या गिअरवर नियंत्रण ठेवा. ठराविक वेगावर ठराविकंच गिअर टाका. यामुळे गाडीचं इंधन वाचवण्यास मदत होते. या कारणाने वेगानुसार गिअर कमी जास्त करणे गरजेचं आहे.

30 सेकंदापेक्षा अधिक कालावधीसाठी सिग्नल लागल्यास गाडी बंद करणे योग्य राहते. यामुळे आपल्या गाडीतील इंधनाची बचत होते. तसेच गाडीच्या चाकांतील हवा वेळोवेळी तपासावी. कारण हवा कमी असल्यास इंजिनला गाडी पूढे नेण्यास जास्त प्रेशर लागते. यामुळे पेट्रोल जास्त खर्च होते.

गाडीतीळ एसी गरज असल्यासच चालू ठेवावा. कारण एसीमुळे इंधन जास्त खर्च होते. तसेच वेळोवेळी गाडीचा मेंटेनन्स देखील ठेवावा. योग्य मेंटेनन्समुळे गाडीला कमी इंधन लागते आणि तुमचे इंधन वाचते.

तसेच गाडीत चांगले इंधन भरा. अनेकदा पेट्रोल पंपांवर भेसळयुक्त इंधन मिळते. यामुळे गाडीला जास्त इंधन लागते. या कारणाने एकाच चांगल्या पेट्रोल पंपवरून नेहमी इंधन भरा.

दरम्यान, पेट्रोलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 60 टक्के कर आकारला जातो. तसेच डिझेलवर राज्य आणि केंद्राचा मिळून तब्बल 54 टक्के कर आकारला जातो. हे कर सरकारने कमी केल्यास पेट्रोल, डिझेलचे दर खाली येऊ शकतात.

पेट्रोल डिझेलचे वाढते दर नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत. सध्याचे केंद्र सरकार पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दराचे खापर पूर्वीच्या सरकारवर फोडत आहे. इंधनाच्या वाढत्या भावावरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची खेळी चालू आहे. मात्र, सामान्य नागरीकंच यामध्ये चेपला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

ऐकावं ते नवलंच! नवरदेवाने भांगात कुंकू भरलं अन् नवरिने लग्नंच मोडलं; सविस्तर वाचा

अबब! सोन्या-चांदीच्या दरात तेजी कायम, वाचा आजचे दर

भाऊ कदम कसे करतात स्क्रिप्टचे पाठांतर?, पाहा व्हिडीओ

देसी जुगाड वापरत ‘या’ काकांनी ब्लेडशिवाय केली…

सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला राखी सावंतने सुनावले असे…