भाजपला मोठा धक्का! देगलूर- बिलोली पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर विजयी

नांदेड | काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाने देगलूर- बिलोली येथे पोटनिवडणूक घेण्यात आली. राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांमुळे देगलूर- बिलोली पोटनिवडणूकीचा प्रचार टोकाला पोहोचला होता.

काँग्रेस पक्षाकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे सुपुत्र जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.विजयी उमेदवार जितेश अंतापुरकर हे अभियांत्रिकी पदवीधर आहेत. तर भाजपकडून शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी दिली होती. तसेच वंचित बहुजन आघाडीकडून डॉ. उत्तम इंगोले यांना उमेदवारी देण्यात आली होती.

पंधराव्या फेरी अखेर जितेश अंतापूरकर यांना 56,409 मतं मिळाली होती ते 19,180 मतांनी आघाडीवर होते. एकूण 512 मतदान केंद्रावर मतदान घेण्यातं आले होते. 26व्या फेरीअखेर जितेश अंतापूरकर 38,126 मतांनी आघाडीवर होते. या फेरीनंतर जितेश अंतापुरकर विजयाच्या जवळ पोहोचले.

शेवटच्या फेरीत जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांचा पराभव जवळपास निश्चित केला आणि त्यांचा 41,933 मतांनी पराभव केला आहे. जितेश अंतापूरकर यांना एकूण 1,08,840 इतकी मते मिळाली आहेत. तर सुभाष साबणे यांना 66 हजार 872 मते मिळाली आहेत.

‘या निवडणुकीच्या निमित्ताने एक सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात काँग्रेसन जागा राखल्या आहेत’, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

हा विजय महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचा संयुक्त विजय आहे, असं म्हणत अशोक चव्हाण यांनी विजयाचं श्रेय महाविकास आघाडीला दिलं आहे. विकासाच्या विचाराला जनतेने साथ दिली आहे, असंही नांदेडचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजानिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

या पोटनिवडणुकीत नांदेडचे अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. देगलूर- बिलोली याठिकाणी अनेक ज्येष्ठ नेते प्रचारासाठी गेले होते. या हायहोल्टेज प्रचार तोफा 28 ऑक्टोबरला थंडावल्या होत्या.

देगलूर- बिलोली येथे पोटनिवडणूकीचा 30 ऑक्टोबरला मतदानं घेण्यात आलं होतं. निवडणुकीत दोनंही तुल्यबळ प्रतिस्पर्धी असल्याने प्रचारात अधिकचं रंगत आली होती. विजयी उमेदवार जितेश अंतापूरकर यांनी देखील प्रतिक्रीया दिली आहे. हा विजय महाविकास आघाडीचा विजय आहे.

माझ्या वडिलांच्या निधनानंतर जनतेने भरभरून प्रेम दिलं त्यामुळे मी निवडूण येऊ शकलो. मतदार संघाच्या विकासाचं माझ्या वडिलांनी जे स्वप्न पाहिलं होतं, ते मी पुर्ण करण्याचा प्रयत्न करेल, अशी भावना जितेश अंतापूरकर यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, देगलूर- बिलोली हा सीमावर्ती भाग आहे. येथे बेरोजगारी ही मुख्य समस्या आहे. याठिकाणी मतदार संघात देगलूर आणि  बिलोली या दोन तालुक्यांचा समावेश आहे.या दोन्ही तालुक्यांमध्ये रस्त्यांची मोठी समस्या आहे. जितेश अंतापूरकर यांच्यासमोर रस्ते विकास आणि रोजगार निर्माण करण्याचं मोठं आव्हान असणारं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपनेच महिलांवर टिप्पणी करण्याचा स्तर खाली आणला- नवाब मलिक

“अनिल देशमुखांवरील कारवाई योग्यच, आता अजित पवारांनी कारवाईला सामोरं जावं”

“आम्ही 25 ते 30 वर्ष उबवणी केंद्र उघडलं होतं, नको ती अंडी उबवली” 

शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला- उद्धव ठाकरे 

“ठाकरे सरकारच्या मदतीनंच परमबीर सिंग गायब”