स्मृती इराणींच्या याचिकेनंतर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेसला फटकारलं, दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली | केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी (Smruti Irani) यांच्या मुलीचे गोवा राज्यात अनधिकृत हॉटेल आणि बार आहे. आणि ती त्याचे संचालन करते, म्हणून त्यांना केंद्रीय मंत्रीपदावरुन हटवा, अशी मागणी करणारे पत्र काँग्रेस नेते पवन खेरा (Pawan Khera) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले होते.

त्यानंतर स्मृती इराणी यांनी अकांड तांडव केला होता. त्यांनी काँग्रेस नेत्यांना माफी मागण्याचे आव्हान केले होते. त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात (Delhi High Court) काँग्रेस विरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला होता आणि थेट न्यायालयात लढाई सुरु केली होती.

आता यावर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस नेत्यांना फटकारले आहे. त्यांना स्मृती इराणी यांच्या मुलीच्या नावाने केलेले सर्व ट्विट तत्काळ डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने जयराम रमेश (Jairam Ramesh), पवन खेरा (Pawan Khera) आणि नेट्टा डिसोजा (Netta D’souza)यांना ट्विट डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच स्मृती इराणी यांनी केलेल्या अब्रुनुकसानीच्या दाव्याच्या पुढील सुनावणीला म्हणजे 18 ऑगस्टला न्यायालयात हजर रहाण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी हे ट्विट डिलीट केले नाही, तर ते ट्विटरला डिलीट करण्याचे निर्देश दिले आहेत.

याप्रकरणी, स्मृती इराणी यांनी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आम्हाला उत्तरे देण्यासाठी नोटीस बजावली आहे. आम्ही न्यायालायात तथ्य मांडण्याची वाट पहात आहोत. स्मृती इराणी यांना आम्ही आव्हान देऊन त्यांचे आरोप खोटे ठरवू, असे ट्विट काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केले आहे.

काँग्रेस नेत्यांनी गोवा राज्यात स्मृती इराणी यांच्या मुलीचे सिली सोल्स कॅफे अँड बार (Silly Souls Cafe and Bar) नावे अवैध मद्यविक्री हॉटेल सुरु असल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी परवान्यासाठी खोटी आणि बनावट कागदपत्रे जोडून एका मृत व्यक्तीच्या नावे वित्तीय वर्ष 2022 – 23 साठी परवान्याचा अर्ज केला होता.

स्मृती इराणी आणि त्यांच्या मुलीच्या वकीलांनी हे आरोप फेटाळले होते आणि काँग्रेसच्या नेत्यांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी त्यांच्यावर माझ्या मुलीच्या चारीत्र्यावर शिंतोडे उडविण्याचे आरोप केले होते.

आता या प्रकरणी जरी न्यायालयाने काँग्रेसच्या तीन नेत्यांना नोटीस पाठविल्या आहेत, तरी काँग्रेस नेते ही लढाई लढणार असल्याचे काँग्रेसच्या तीन नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या –

“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?” 

‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट

“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”

“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”

“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”