धक्कादायक! दिल्लीत भररस्त्यात पतीने पत्नीला चाकूने भोसकलं; व्हिडीओ व्हायरल

दिल्ली | अलीकडे काही वर्षांमध्ये गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अलीकडच्या वर्षांमधील देशातील गुन्हेगारींचे आकडे हादरवून टाकणारे आहेत. अशातच आता दिल्लीत आणखी एक देश हादरवून सोडणारी धक्कादायक घटना घडली आहे.

दिल्लीत एका व्यक्तीने दिवसाढवळ्या भररस्त्यात आपल्या पत्नीची चाकूने भोसकून हत्या केली आहे. जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झाली होती. सध्या हेच सीसीटीव्ही फोटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

माहितीनुसार, आरोपी पतीचं नाव हरीश मेहता असं आहे. हरीश मूळचा गुजरात मधील अलकापुरी येथील रहिवासी आहे. सध्या हरीश दिल्लीमध्ये वास्तव्यास होता. तो दिल्लीमध्ये एका मॅरेज ब्युरोमध्ये काम करत होता.

आठ महिन्यांपूर्वी हरीशचं निलूसोबत लग्न झालं होतं. निलू सफदरजंग येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करत होती. लग्न झाल्यापासून या दोघांमध्ये सतत कोणत्या न कोणत्या कारणावरून वाद सुरू होते.

आपल्या पत्नीचे बाहेर कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपी हरिशला होता. या कारणावरुन हरीश आणि निलूमध्ये अनेकवेळा वाद देखील झाले. हरिशने अनेकवेळा मृत निलूला मारहाण देखील केली.

यामुळे निलूने पतीला सोडून आपल्या आई वडिलांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि निलू आपल्या माहेरी राहत होती. यामुळे आरोपी हरिशने निलूचा काटा काढायचं ठरवलं. निलू काहीतरी कामानिमित्त चालली असताना हरीशने तिला भररस्त्यात गाठलं आणि चाकूने भोसकून तिची हत्या केली.

घटनास्थळी असणाऱ्या सीसीटीव्हीमध्ये ही सर्व घटना कैद झाली. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की, घटनास्थळावरून खूप साऱ्या लोकांची ये जा चालू आहे. अनेक लोक रस्त्याच्या आजूबाजूला उभी आहेत. निलू याच रस्त्यावरून चाललेली असते. तितक्यात आरोपी हरीश तेथे येतो आणि तिच्यावर सपासप चाकूने वार करू लागतो.

घटनास्थळी उपस्थित असणाऱ्यांपैकी एकंही जण निलूच्या मदतीसाठी पुढे येत नाही. हरीश सर्वांना चाकूचा धाक दाखवून लांब होण्यास सांगतो. हे सीसीटीव्ही फोटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं दिल्लीतील लोकांच्या मनात एकंच भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

महत्वाच्या बातम्या – 

‘हे काय वागणं आहे सिद्धार्थ?’ लग्नाच्या दोन महिन्यात मिताली-सिद्धार्थचं झालं भांडण?, वाचा नेमकं काय झालं

फोटोतील ‘या’ चिमुकलीला ओळखलं का?; आज करतेय…

कपिल शर्माच्या शिरपेचात मानाचा तुरा! इयत्ता चौथीच्या…

‘या’ अभिनेत्रीच्या चित्रपटातून इरफान खानचा मुलगा…

‘महाभारत’मधील इंद्राची भूमिका साकारणाऱ्या…