काँग्रेसची दिल्ली विधानसभेसाठी ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली | दिल्लीत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आम आदमी पार्टी, भाजप आणि काँग्रेसने पक्षाला विजयी करण्यासाठी कंबर कसली आहे. काँग्रेसनेही निवडणुकीत जोर लावला असून आपल्या जाहिरनाम्यात महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.

काँग्रेसने जाहिरनाम्यात बेरोजगारांना भत्ता देण्याची घोषणा केली आहे. पदवीधारकांसाठी 5 हजार रुपये तर पदव्युत्तरांसाठी 7500 रुपये बरोजगारी भत्ता देणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. त्यामुळे बेरोजगारांसाठी पक्षाकडून महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसला दिल्लीत महाराष्ट्रासारखे निकाल लागण्याची आशा आहे.

दिल्लीकरांना महिन्याला 300 युनिट वीज मोफत देण्याचीही घोषणा केली आहे. तसेच स्वस्तात जेवण उपलब्ध करुन देण्यासाठी 100 इंदिरा कँटिन सुरु करणार असल्याचंही जाहिरनाम्यात म्हणण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना नर्सरी ते पीएचडीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं वचनही काँग्रेसने दिलं आहे.

दरम्यान, देशाची राजधानी काबीज करण्यासाठी सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, दिल्लीकर कोणाच्या पारड्यात विजय टाकतात हे बघावं लागेल.

महत्वाच्या बातम्या-

-पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खास पथक; यावर्षीच्या बजेटमध्ये केली तब्बल 600 कोटींची तरतूद

-“शिवसेनेचे मंत्री कारकूना सारखे टेबलवरील पेन आणि फाईल उचलण्याचं काम करत असतात”

-नागरीकत्व सिद्धं करणं हे केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाणार- उद्धव ठाकरे

-“उद्धव ठाकरेंना फिरायला वेळ आहे…… दखल घ्या नाहीतर मातोश्रीबाहेर आत्मदहन करू!”

-“दिल्लीत भाजपला 40 पेक्षा अधिक जागा मिळतील”