मुंबई | कोरोनाच्या (Deltacron) तिन्ही लाटेत आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात ताण आला होता. आता उन्हाळ्यात पुन्हा कोरोना रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा लोकांच्या अडचणी वाढवल्या आहेत. अलीकडेच, डेल्टाक्रॉन या कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार समोर आला आहे.
कोरोनाचा हा नवा व्हायरस डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरियंटपासून बनलेला असल्याचं सांगण्यात येत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याबद्दल एक अहवाल देखील सादर केला आहे.
नवीन डेल्टाक्रॉन प्रकाराची काही प्रकरणे काही युरोपियन देशांमध्ये, फ्रान्स, नेदरलँड्स आणि डेन्मार्कमध्ये नोंदवली गेली आहेत. आतापर्यंत या प्रकाराची फारच कमी प्रकरणं पाहण्यात आली आहेत.
वैज्ञानिकांना या नवीन प्रकाराबद्दल पुर्णपणे माहिती नाही. परंतु हा प्रकार किती धोकादायक आणि संसर्गजन्य आहे हे शोधण्यासाठी शास्त्रज्ञ त्याचं निरीक्षण करत असल्याची माहिती देखील मिळाली आहे.
दरम्यान, उच्च ताप येणं, कफ, वास न येणं, सतत नाक गळणं, थकवा लागणं, डोकेदुखी, अगंदुखी, घशात खवखवणे, उलटी होणे, यासारखी लक्षणं दिसून येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
राज्यपालांचा ठाकरे सरकारला दणका! विशेषाधिकार वापरत रद्द केला ‘तो’ मोठा निर्णय
सर्वात मोठी बातमी; कोरोनाबाबत WHO चा जगाला अत्यंत गंभीर इशारा
अत्यंत महत्त्वाची बातमी; LPG सिलेंडरच्या दरात झाला मोठा बदल
बालात्काराचा आरोप असलेल्या शिवसेना नेत्याचे खळबळजनक कॉल रेकॉर्डिंग्स व्हायरल!
“‘द कश्मीर फाइल्स’चं काय, ‘ठाकरे’ सिनेमाही आम्ही महाराष्ट्रात टॅक्स फ्री केला नव्हता”