मुंबई | क्रिकेटच्या सर्वात रोमांचकारी प्रकारातील जगप्रसिद्ध स्पर्धा म्हणून आयपीएलला ओळखलं जातं. आयपीएलच्या या हंगामाचा शेवट आता जवळ आला आहे.
स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यापर्यंत प्ले ऑफचा चौथा संघ कोण याचं उत्तर मिळालेलं नाही. दिल्ली कॅपिटल्स आणि राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू संघामध्ये चौथ्या स्थानासाठी स्पर्धा लागली आहे.
आरसीबीनं गुजरात टायटन्सला पराभूत करत आपल्या प्ले ऑफमध्ये जाणाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अशात मग आरसीबी संघाला दिल्लीच्या पराभवाची देखील वाट पाहावी लागणार आहे.
दिल्लीचा शेवटच्या सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध आहे. या सामन्यावर दिल्लीसह आरसीबीचं भवितव्य देखील अवलंबून आहे. दिल्लीचा विजय झाला तर आरसीबी आपोआप स्पर्धेबाहेर जाईल.
दिल्लीचा पराभव हा एकमेव मार्ग आता आरसीबीला स्पर्धेत टिकवून ठेवू शकतो. आरसीबीनं गुजरातवर विजय मिळवताना आपल्या धडाकेबाज फलंदाजीचं प्रदर्शन केलं.
विराट कोहली प्रदिर्घ कालावधीनंतर चांगल्या फाॅर्मात दिसला. परिणामी आता आरसीबीला नशीबाची साथ लाभनं देखील गरजेचं आहे. आरसीबी सध्या 16 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
दरम्यान, लखनऊ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स आणि राजस्थान राॅयल्सनं याअगोदरच प्ले ऑफमध्ये आपली जागा पक्की केली आहे. परिणामी यंदा आयपीएलचा नवा विजेता मिळण्याची शक्यता वाढली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! नवज्योतसिंग सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
“मुस्लिमांनी आयुष्यभर काँग्रेसला मतदान करून आपली जिंदगी झंड बनवली”
…अन्यथा हेल्मेट घातलं तरी भरावा लागेल ‘इतका’ दंड!
ज्ञानवापी मशिद प्रकरणावर कंगणा राणावतचं मोठं वक्तव्य, म्हणाली…