मुंबई | महाराष्ट्रात सुरू असलेला सत्तासंघर्ष आता शांत झाला आहे. गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
ऐनवेळेला देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. देवेंद्र फडणवीसांनी अचानक उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार सांभाळताच अॅक्शन मोडमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. फडणवीसांनी बैठकांचा सपाटा लावला असून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.
देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनेची बैठक पार पडली. यावेळी कोकणातल्या भूस्खलनाच्या जागांची माहिती घेतली.
मुंबईत धोकादायक इमारतींना नोटीस देण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. तसेच बैठकीत कोकणातील दरडग्रस्त गावांचा आढावा घेतला असल्याचंही फडणवीस म्हणाले.
मनुष्यहानी टाळण्यासाठी तात्पुरत्या स्थलांतराला प्राधान्य द्या, असे निर्देश देखील फडणवीसांनी दिले आहेत.
दरम्यान, आज ओबीसी आरक्षणासंदर्भात आढावा बैठक झाल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नीरज चोप्राने रचला आणखी एक इतिहास, मोडला स्वत:चाच विक्रम
काय सांगता? कोरोना व्हायरसमागे एलियनचा हात?, किम जोंग उनच्या दाव्याने खळबळ
सर्वांचं प्रेम जर क्वचित कुणाला लाभलं असेल तर मला लाभलंय- उद्धव ठाकरे
‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून परताल वाटलं होतं पण…’, राज ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांना पत्र
‘हात जोडून विनंती आहे माझ्यावरचा राग…’, शिंदे सरकारला उद्धव ठाकरेंचं जाहीर आवाहन