आता तरी सुधरा राव, चीनमध्ये पुन्हा कुत्रा, मांजर, उंदीर, वटवाघूळ मांस विक्री सुरू!

नवी दिल्ली | संपूर्ण जगात दहशत पसरवणाऱ्या करोना विषाणूचा प्रसार सर्वप्रथम चीनमधून झाला होता. चीनमधील खाद्यसंस्कृतीमुळेच करोनासारख्या प्राणघातक विषाणूची निर्मिती झाली, असा दावा काही तज्ज्ञांनी केला होता. चीनमध्ये हैदोस घातलेल्या कोरोनाने आता कुठेतरी चीनमधील परिस्थिती आवाक्यात येत असताना तिथं पुन्हा मांस विक्रीला सुरूवात झाली आहे.

चीनच्या बाजारांमध्ये कुत्रा, मांजर, उंदीर, वटवाघूळ यांसारख्या प्राण्यांचे मांस पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. किंबहूना चिनी लोकांनी हे प्राणी खाण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.

वटवाघूळ आणि खवल्या मांजराच्या मांसांमधून कोरोनाचे संक्रमण मानवामध्ये झाल्याचा अंदाज काही संशोधकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे एकीकडे संपूर्ण जग करोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी लॉकडाउनच्या माध्यमातून घरी बसलेलं असताना दुसरीकडे चीनने मांसविक्री सुरु करण्याची पवानगी दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, कोरोनाच्य कचाट्यात अजूनही काही देश आहेत. इटलीमध्ये मोठ्या संख्येने कोरोनाबाधितांचा मृत्यु झाला होता. जर्मनीतील एका अर्थमंत्र्यांनी तर आपलं जीवन संपवलं. हे सर्व घडत असताना चीनने मांस विक्रीला सुरूवात केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-‘रामायण’, ‘महाभारता’नंतर आता ‘शक्तिमान’ आणि ‘चाणक्य’ही प्रेक्षकांच्या भेटीला

-इस्लामपूरमध्ये आढळलेले कोरोनाचे रुग्ण मोदींवर टीका केल्याची शिक्षा- अवधूत वाघ

-दिल्लीत एका धार्मिक कार्यक्रमाला गेलेल्या 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

-भारतातील मशिदी बंद करा; जावेद अख्तर यांची मागणी

-“स्वत:ला मोदीभक्त म्हणवून घेणाऱ्यांचेच मेंदू सडलेले”