…म्हणून भाजपच्या विभागप्रमुखाला पोलिसाची मारहाण

लखनउ : उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये वाहनांची तपासणी सुरु असताना पोलिसांनी भाजपाचे कनापूरमधील विभागप्रमुख देवेंद्र राजपूत यांची दुचाकी थांबवली. त्यावेळी राजपूत आणि पोलिसांदरम्यान बाचाबाची झाली. त्यानंतर संतापलेल्या पोलीस निरीक्षकाने राजपूत यांना मारहाण केली. या प्रकरणात निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेलेल्या माहितीनुसार राजपूत यांना पोलिसांनी तपासणीसाठी थांबवले असता त्यांनी पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. ‘मी पोलिसांना माझी ओळख सांगितल्यानंतरही त्यांनी मला थांबवल्याने वाद सुरु झाला,’ असं राजपूत यांनी सांगितलं आहे.

राजपूत यांच्याकडे कागपत्रांची मागणी केली त्यावरुन त्यांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. राजपूत आणि पोलीस अधिकारी धर्मेंद्र यादव यांच्यामधील शाब्दिक वाद हाणामारीपर्यंत गेला. दोघे एकमेकांना मारु लागल्यानंतर पोलीस कर्मचारी आणि रस्त्यावरुन जाणाऱ्यांना त्यांच्यामध्ये पडून वाद सोडवावा लागला.

राजपूत ते आपल्या दुचाकीवर दूध आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना मटौली पोलीस स्थानकाच्या हद्दीतील उड्डाणपूलाखाली पोलीस निरीक्षक धर्मेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली काही पोलीस हवलदार वाहनांची तपासणी करत होते, असं पोलिसांनी सांगितलं.

ठिकाणी राजपूत यांना तपासणीसाठी थांबवण्यात आले असता त्यांनी पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. पोलिसांशी वाद सुरु झाल्यानंतर राजपूत यांनी फोन करुन पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही गोळा करण्याचा प्रयत्न केला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे. 

महत्वाच्या बातम्या-